‘म्हाडा’ पेपरफूट प्रकरणाचे जळगावात ‘खोदकाम’

पुणे पोलिसांक़ून बालाजी जॉब प्लेसमेंटच्या ॲड. दर्जीला अटक.
Adv Vijay Darji
Adv Vijay DarjiSarkarnama

जळगाव : शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Exam) गैरव्यवहार प्रकरणाचा तपास करताना मिळालेल्या धाग्यादोऱ्यांच्या आधारे पुणे (Pune Police) पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी म्हाडा पेपरफुटीतील मुख्य संशयित ॲड. विजय दर्जीला (Adv. Vijay Darji) जळगावच्या (Jalgaon) गोलाणी व्यापारी संकुलातील कार्यालयातून ताब्यात घेतले. रीतसर अटक करून संशयित ॲड. दर्जी याला घेऊन पथक पुण्याला रवाना झाले आहे. (TET Exam paper leak case police arrest agents from Jalgaon)

Adv Vijay Darji
अपमानास्पद पदावरून मुक्त करा! काँग्रेस मंत्र्याचीच मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शिक्षक पात्रता पूर्वपरीक्षा टीईटी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने जळगावात दिवसभर धाडसत्र राबवून रात्रीपर्यंत अनेकांची चौकशी केली. टीईटी घोटाळ्याचा तपास करत असतानाच जळगाव येथील बालाजी जॉब प्लेसमेंटचे ॲड. दर्जी याला पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने म्हाडा पेपरफुटीप्रकरणी ताब्यात घेतले.

Adv Vijay Darji
गिरीश बापट, रावसाहेब दानवेंचे तिकीट कापणार ?

सध्या चर्चेत असलेल्या टीईटी घोटाळ्यातून म्हाडा पेपरफुटीचे प्रकरण जळगाव जिल्ह्यापर्यंत पोचल्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

काही एजंट अटकेत

टीईटी पेपरफूट प्रकरण जळगाव, भडगावसह यावल व पारोळा तालुक्यातील काही एजंटांमार्फत संपूर्ण जिल्ह्यात टीईटी घोटाळ्यातील गैरव्यवहाराला चालना देण्यात आल्याचे समजते. चौकशीनंतर तपासाची दिशा याच एजंटांच्या मागावर आली आहे. जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्याबरोबर सुरंजित गुलाब पाटील (वय ५०, रा. उत्तरानगर, नाशिक), स्वप्नील तीरसिंग पाटील (रा. शिक्षक कॉलनी, चाळीसगाव), जळगाव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

धक्कादायक म्हणजे म्हाडा पेपरफुटीप्रकरणी पुणे पोलिसांनी काही कॉल रेकॉर्डिंग तसेच सोशल मीडियाचे स्क्रीन शॉटसह आणखी काही महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले असल्याचे तपासपथकातर्फे सांगण्यात आले.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com