एक लाखाची लाच घेताना उपनिरीक्षक योगेश ढिकले जेरबंद

मेहुणबारे पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकास सापळा रचून केली कारवाई
PSI Yogesh Dhikle
PSI Yogesh DhikleSarkarnama

चाळीसगाव : मेहुणबारे (Jalgaon) पोलिस ठाण्याlतील पोलिस (Police) उपनिरीक्षक योगेश जगन्नाथ ढिकले यांस एक लाख रपयांची लाच स्विकारताना अटक करण्यात आली. गुन्ह्यातील कागदपत्रांत फेरफार करण्यासाठी साडे चार लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. (Psi Deemands 4.50 lacs bribe for chargesheet)

PSI Yogesh Dhikle
सुहास कांदेंची आता ‘आमदार आपल्या दारी’ मोहिम

येथील पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या कागदपत्रांमध्ये मदत करून चार्जशीट लवकरात लवकर ठेवण्यासह पोलिस ठाण्यात दिलेली हजेरी माफ करण्याच्या मोबदल्यात उपनिरीक्षकाने संशयित आरोपीकडून तब्बल साडेचार लाख रुपयांची मागणी केली. मात्र, तडजोडीनंतर एक लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविल्यानंतर पथकाने सापळा रचून लाचखोर उपनिरीक्षकाला एक लाख रुपयांची लाच घेताना जेरबंद केले.

PSI Yogesh Dhikle
आमदार माणिकराव कोकाटेंना मिळणार भारत कोकाटेंचे थेट आव्हान!

गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव योगेश जगन्नाथ ढिकले असे आहे. या घटनेमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

येथील २७ वर्षीय तक्रारदाराच्या विरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात २९ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील कागदपत्रांमध्ये मदत करून चार्जशीट लवकरात लवकर पाठवून गुन्ह्यात मदत करण्याच्या व पोलिस ठाण्यात दिलेली हजेरी माफ करण्याच्या मोबदल्यात मेहुणबारे पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक योगेश ढिकले (वय ३२) यांनी तक्रारदाराकडे साडेचार लाख रुपयांची मागणी केली.

तडजोडीनंतर ही रक्कम एक लाखावर आली. मात्र, तक्रारदाराला लाचेची ही रक्कम ढिकले यांना द्यायची नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, गुरुवारी दुपारी पोलिस ठाण्यातच सापळा रचून उपनिरीक्षक योगेश ढिकले यांना एक लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या पथकाने केली.

उपनिरीक्षक योगेश ढिकले यांना अटक करण्यात आली असून, तपास पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील शहादा आगारात करीत आहेत. दरम्यान, पोलिस ठाण्यात उपनिरीक्षकालाच लाच घेताना पकडण्यात आल्याने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

लाचखोरीची चौथी घटना

मेहुणबारे पोलिस ठाण्यात यापूर्वी लाच घेतल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. आजची ही कारवाई चौथी असल्याने मेहुणबारे पोलिस ठाण्याला लाचखोरीचे ग्रहण लागले की काय, अशी चर्चा होत आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com