केंद्र सरकार बाबासाहेबांच्या राज्यघटनेच्या विरोधी बोलणाऱ्यांना `पद्मश्री` देते

वाडिवऱ्हे येथे जनजागरण अभियानांतर्गत केंद्र सरकारवर सडकून टीका
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

नाशिक : देशात जी व्यक्ती घटनेच्या विरोधात काम करेल त्यास पद्मश्री (Padmshri Award) देऊन गौरविण्यात आले आहे आणि जगाचा पोशिंदा शेतकरीला तालिबानी, आंदोलनजिवी ठरविण्यात आले, मात्र पाच राज्यातील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत कृषीचे तीन कायदे मागे घेतले, हा शेतकऱ्यांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा (Constitution of India) विजय असल्याचे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.

Balasaheb Thorat
देवेंद्र फडणवीस यांचे संकेत, एस. टी. कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण अशक्य

कॉंग्रेसतर्फे राज्यभर सुरू असलेल्या जनजागरण अभियानांतर्गत वाडिवऱ्हे येथे येथील इंदुमती लॉन्स पदयात्रा आणि रात्रभर जागरण गोंधळाचा निषेधात्मक कार्यक्रम झाला, त्याप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मान्यवरांनी शेतकरी विरोधी सरकारला केंद्रातून हटवा असे आवाहन केले.

Balasaheb Thorat
चंद्रकांत पाटील म्हणतात, राऊत यांनी माझी तपासणी करावी, मी राऊतांचे डोके तपासतो!

ते म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या निषेधार्थ महागाई वाढतच चालली आहे. सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. शेतीमालाला भाव नसल्याने कर्जबाजारीपण वाढले. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. बेरोजगारी वाढत असून कृषी कायदे रद्द करावे लागणे हे त्याचेच द्योतक आहे. सरकारने कायदे मागे घेत आपण जनतेविरोधात जाऊ शकत नाही हेच दाखवून दिले आहे, अशा या जनतेविरोधातील सरकारला त्याची जागा दाखवून द्या अशी जोरदार टीका कॉंग्रेसतर्फे करण्यात आली.

बेरोजगारी ही समस्या

जिल्हाध्यक्ष डॉ तुषार शेवाळे यांनी तालुक्यातील परिस्थिती विशद करताना बहुतांश जमीन शासनाने विविध प्रकल्पात संपादन केली असल्याने औद्योगिक वसाहत असूनही वाढती बेरोजगारी ही येथील प्रमुख समस्या बनली आहे. त्यामुळे सरकार स्तरावर प्रयत्न व्हावेत. कॉंग्रेसने स्थानिकांना रोजगारनिर्मितीला प्राधान्य दिल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

कलापथकाद्वारे मोदींवर टीका

मोदी सरकारविरोधात रात्रभर जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला. या गोंधळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर व भरमसाठ वाढणाऱ्या इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीविरोधात गाण्यांच्या माध्यमातून शाहीर उत्तमराव गायकर यांच्या आनंदतरंग या कलापथकाने जोरदार हल्ला करीत प्रबोधन केले, महसूल मंत्र्यांसोबत असलेल्या सुमारे तीनशे कार्यकर्त्यांनी वाडीवऱ्हे येथे मुक्काम केला.

यावेळी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, आमदार हिरामण खोसकर, संदीप गुळवे, प्रदेश सचिव भास्करराव गुंजाळ, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, महिला अध्यक्षा मनीषा मालुंजकर, इगतपुरी शहराध्यक्षा सविता पंडित, माजी सभापती गोपाळा लहांगे उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com