पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न नंदुरबारमध्ये साकार होताना दिसतेय!

केंद्राच्या योजना अंमलबजावणीबाबत आरोग्य मंत्री मांडवीय समाधानी
Mansukh mandviya, Centre Minister
Mansukh mandviya, Centre MinisterSarkarnama

नंदुरबार : आदिवासी (Trible) आकांक्षित जिल्ह्यात विकास कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय (Centre) आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया (Mansukh mandviya) दोन दिवस नंदुरबार (Nandurbar) जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा उपस्थितीत शनिवारी विविध कार्यक्रम झाले. त्यांनी भेटी दरम्यान समाधान व्यक्त केले.

Mansukh mandviya, Centre Minister
राज ठाकरेंना इशारा... तर वारकरी गुन्हे दाखल करतील!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या वतीने विकासापासून मागे राहिलेल्या आकांक्षित जिल्ह्यांची निवड करून केंद्रीय मंत्रीमंडळाच्या वतीने सदर जिल्ह्याला पाहणी करून त्या जिल्ह्यातील रोजगार, शेती, उद्योग, आरोग्य, शिक्षण याबाबतीत राबविल्या गेलेल्या योजनांचा आढावा घेण्यात येत आहे. त्यासाठी मांडविया यांनी समाधान व्यक्त केले.

Mansukh mandviya, Centre Minister
स्टीलच्या दरवाढीवर नितीन गडकरींचा स्टील फायबरचा पर्याय!

जिल्हा ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या आरोग्य सुविधांबाबत पाहणी केली. या अंतर्गत त्यांनी महिला रुग्णालय, पोषण पुनर्वसन सेंटर, डायलिसीस सेंटर, टेलिमेडिसीन सेंटर आदी विभागांना भेटी देऊन, प्रत्यक्ष व दूरसंवाद यंत्राने मार्फत रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व त्यांना मिळणाऱ्या सेवेबद्दल माहिती जाणून घेतली. जिल्हा रूग्णालयात असलेल्या महिला रूग्णालयात वाढीव शंभर खाटांचे रूग्णालय इमारतीचा मजला बांधकामाचे भूमिपूजन मंत्री मांडविय यांच्या हस्ते करण्यात आले.

नंदुरबार तालुक्यातील नांदरखेडा या ग्रामीण भागातील आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनीला भेट देऊन आरोग्याच्या सुविधा बाबत माहिती जाणून घेतली. तसेच नंदुरबार नगरपालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या शाळा क्रमांक एक मधील डिजिटल शाळेला भेट देऊन आढावा घेतला. तेथे शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले. आगामी काळात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणक्षेत्रात डिजिटल शिक्षणाला जास्त महत्त्व येणार असून, त्यासाठी तयारी करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

यानंतर कोळदे येथे कृषी विज्ञान केंद्रात भेट देऊन शेतीबद्दल राबविण्यात येणाऱ्या योजनांबद्दल माहिती घेतली. तसेच कृषी प्रदर्शनी व महिला बचत गट मार्फत निर्मित खाद्य पदार्थ आणि वस्तूंच्या प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच केव्हीके मार्फत सूर करण्यात आलेल्या टेली कम्युनिकेशन रेडिओ केंद्राची पाहणी करून रेडिओ द्वारे शेतकऱ्यांना संदेश दिला. नव्यानेच उभारण्यात आलेल्या तापमान मोजणी प्रकल्पाची कार्यप्रणाली जाणून घेतली. तेथे वरिष्ठ संशोधक राजेंद्र दहातोंडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे भाजप कार्यकर्त्यांची भेट घेतली.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाची आढावा बैठक, आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स,नर्सेस तसेच एनजीओ प्रतिनिधी यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील आरोग्याचे प्रश्‍नांवर चर्चा केली. या सर्व दौऱ्यात मंत्री डॉ.मांडवीय यांच्यासोबत खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ विजयकुमार गावित, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com