Prof. V. G. Patil
Prof. V. G. PatilSarkarnama

Crime News; काँग्रेस शहराध्यक्षांच्या हत्त्येतील राजू सोनवणेची निर्दोष मुक्तता

जळगाव काँग्रेसचे नेते प्रा. व्ही. जी. पाटील खून खटल्यात १८ वर्षांनंतर औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निकाल

जळगाव : (Jalgaon) काँग्रेसचे (Congress) तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही. जी. पाटील (तात्या) (Prof. V. G. Patil) खून प्रकरणातील (Crime) मुख्य आरोपी राजू सोनवणे (Raju Sonawane) याची औरंगाबाद उच्च न्यायालयाने (High Court) तब्बल १८ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली आहे. या वृत्ताला जळगाव न्यायालयात राजू सोनवणे याची बाजू मांडणारे अॅड. एस. के. कौल (Adv. S. K. Kaul) यांनी दुजोरा दिला आहे. (Congress leader patil Murder case accused acquittal after 18 years by High Court)

Prof. V. G. Patil
Eknath Shinde News; मुख्यमंत्र्यांची उत्तर महाराष्ट्रात राजकीय साखरपेरणी!

काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही. जी. पाटील त्यांच्या निवासस्थानातून कारने २१ सप्टेंबर २००५ ला नूतन मराठा महाविद्यालयात जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांना चाकूने भोसकून त्यांचा खून झाला होता.

Prof. V. G. Patil
Chhatrapati Shivaji Maharaj; महाराजांच्या सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळीचा विश्वविक्रम!

मानराज पार्कसमोरच मैदानात त्यांच्या पाळतीवर असलेल्या दोन हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनी चाकूने भोसकत त्यांची हत्या केली होती. जिल्हापेठ पोलिसांत या प्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन तपासाधिकारी वाय. डी. पाटील यांच्यासह पथकाने २५ सप्टेंबर २००५ ला काँग्रेस कार्यकर्ता राजू माळी व त्याचा शालक राजू सोनवणे या दोघांना नंतर ६ नोव्हेंबर २००५ ला लीलाधर नारखेडे व दामू लोखंडे यांना अटक केली होती.

राजू माळीचा मृत्यू अन्‌ जन्मठेप

न्यायालयाने ३ फेब्रुवारी २००६ ला नारखेडे व लोखंडे यांचा एफआयआर रद्द केली होती. नंतर सुप्रीम कोर्टानेही हाच निकाल कायम ठेवला होता. दुसरीकडे माळी व सोनवणे यांच्या विरोधात जिल्‍हा न्यायालयात खटला चालू असताना ६ एप्रिल २००७ ला राजू माळी याचा दुर्धर आजाराने कोठडीत असताना उपचारार्थ दाखल झाल्यावर मृत्यू झाला होता. त्यानंतर राजू सोनवणेविरोधात खटला सुरू राहिला. त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये खटल्याचा निकाल होऊन जळगाव जिल्‍हा न्यायालयाने राजू सोनवणे यास खून करणे व खुनाचा कट रचणे या आरोपाखाली दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर संशयिताच्या वतीने औरंगाबाद उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणी अनेक वर्षांपासून सुनावणी सुरू होती. १७ फेब्रुवारी २०२३ ला न्यायमूर्ती वि. भा. कनकवडी, न्या. अभय एस. वाघवासे यांच्या संयुक्त पीठाने निकाल देताना जन्मठेप भोगत असलेला आरोपी राजू चिंतामण सोनवणे (माळी) याची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिलेत. या निकालाची संक्षिप्त ऑर्डर खंडपीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. संपूर्ण ऑर्डर समोर आल्यावरच खंडपीठाच्या निकालात नेमकं काय म्हटलंय हे समजू शकेल, असेही विधिज्ञांचे म्हणणे आहे.

खंडपीठाने या प्रकरणी १७ फेब्रुवारीला निकाल दिला आहे. जिल्हा न्यायालयात दाखल कामकाजाप्रसंगी सदर कामकाजावरच खंडपीठातही कामकाज चालले. याचिकाकर्त्याच्या वतीने पूर्वी ॲड. शर्मा कामकाज पाहात होते. मात्र त्यांचे निधन झाल्यावर खंडपीठाने विधी सेवेंतर्गत ॲड. काझी यांची नियुक्ती केली होती. जन्मठेप झालेल्या राजू सोनवणे यांची निर्दोष मुक्तता झाल्याचे खंडपीठाच्या आदेशात म्हटले आहे. परंतु पूर्ण ऑर्डर एक- दोन दिवसांत संकेतस्थळावर येईल, त्याचवेळी नेमकं खंडपीठाने काय म्हटलं आहे, ते सांगता येईल.

- अॅड. एस. के. कौल, आरोपी राजू सोनवणे यांचे वकील, जळगाव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com