Shevgaon-Pathardi : तूर्तास तरी बॅटरी घड्याळात राहणार; घुलेंनी स्पष्ट केली भूमिका

Chandrashekhar Ghule : आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागा; घुलेंनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले
Chandrashekhar Ghule
Chandrashekhar GhuleSarkarnama

Ahmednagar : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाला. हा पराभव घुलेंच्या चांगलाच जिव्हारी लागल्याची चर्चा सुरु असतानाच घुलेंनी आता विरोधकांना इशारा देत आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहेत.

माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी शेवगावमध्ये मंगळवारी (दि.14 मार्च) कार्यकर्ता सुसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी येत्या काळात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा थेट इशारा दिला. त्यामुळे येत्या काळात शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Chandrashekhar Ghule
Fadanvis on Old Pension Scheme: नवीन पेन्शन योजनेबाबत लोकांच्या मनात एवढी अढी का? : फडणवीस म्हणाले ...

यावेळी मेळाव्यात बोलताना घुले म्हणाले, ''अनेक निवडणुका मी पाहिल्या आहेत. लढल्या आहेत. त्यामध्ये जय-पराजय झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नका. आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागा''.

''येत्या विधानसभा निवडणुकीत बदल घडवायचा आहे. विरोधकांना आपली ताकद दाखवून देऊ. येत्या काळात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'', असा इशाराही घुले यांनी दिला.

''सध्या मतदारसंघात खूप प्रश्न आहेत. पण ते लोकप्रतिनिधींना सोडविता आलेले नाहीत. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींच्या विरोधात भूमिका घ्यावी लागणार आहे. लवकरच गावागावांत संघर्ष यात्रा आपण काढणार आहोत''.

''या यात्रेच्या माध्यमातून विरोधकांची पोलखोल करणार आहोत. २०२४ च्या निवडणुकीत बदल घडवायचा आहे. आता थांबायचं नाही'', असं म्हणत घुले यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावर जोरदार टीका केली.

Chandrashekhar Ghule
Kisan Morcha Long march News : मोर्चेकऱ्यांशी गिरीश महाजन चर्चा करायला जाणार, तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू.

दरम्यान, डॉ.क्षितिज घुलेंनीही या मेळाव्यात संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ''घड्याळातील काट्यांना वाटतं आपण घड्याळ चालवतो. पण त्यांना माहिती नाहीये, बॅटरीमुळे घड्याळ चालते. ती बॅटरी म्हणजे आपण आहोत. त्यामुळे तूर्तास तरी घड्याळात बॅटरी राहणार आहे'', असं सांगत पक्ष सोडण्याच्या चर्चांवर त्यांनी पडदा टाकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com