Shivsena: हाकालपट्टी केलेले तिदमे म्हणतात, संघटनेचा अध्यक्ष मीच!

मुन्सिपल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदावरून धूमशान सुरु, पदाधिकारी तिदमेंबरोबर असल्याचा दावा
Pravin Tidme
Pravin TidmeSarkarnama

नाशिक : शिवसेनेचे (Shivsena) माजी नगरसेवक व नाशिक महानगरपालिका म्युनिसिपल कर्मचारी संघटनेचे (Municiple employees organisation) अध्यक्ष प्रवीण तिदमे शिंदे गटात (Eknath Shinde Group) सहभागी झाल्यानंतर संस्थापक अध्यक्ष बबन घोलप (Baban Gholap) यांनी त्यांची केलेली हकालपट्टी जिव्हारी लागली. त्या अनुषंगाने बुधवारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत तिदमे हेच अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला. (Rebel corporator Pravin Tidme said he had support of major office bearers)

Pravin Tidme
Shivsena Alert: सतर्क झालेले नेत्यांची नाशिकमध्ये `घर- घर` मोहीम!

नाशिक मुन्सिपल कर्मचारी संघटना ही नाशिक महापालिकेतील सर्वात मोठी संघटना आहे. जवळपास चार हजाराहून अधिक सदस्य या संघटनेत आहे. संघटनेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेशाबरोबरच शिंदे गटांकडून नाशिक महानगर अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.

Pravin Tidme
NCP News: भामरेंकडून भातकळकरांची खिल्ली, त्यांच्या मेंदूचा खळ झाला आहे!

श्री. तिदमे यांनी शिंदे गटाचा मार्ग स्वीकारल्याने मुन्सिपल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबन घोलप यांनी संध्याकाळी पत्र काढत त्यांची पदावरून तातडीने हकालपट्टी केली व संघटनेचा अध्यक्ष स्वतःच असल्याचे जाहीर केले. सदर बाब जिव्हारी लागल्याने तिदमे यांनी बुधवारी दुपारी दीड वाजता संघटनेच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

संघटनेचे उपाध्यक्ष जीवन लासुरे, रावसाहेब रूपवते, सरचिटणीस राजेंद्र मोरे, सहचिटणीस भूषण देशमुख, खजिनदार उत्तम बिडगर, सचिव सोमनाथ कासार, मुख्यालय प्रमुख नंदकिशोर खांडरे व उपखजिनदार विशाल तांबोळी यांनी तिदमे यांच्यावर विश्वास व्यक्त करत तेच अध्यक्ष असल्याचा दावा केला. यामुळे म्युनिसिपल कर्मचारी संघटनेत पदावरून सुरू झालेले धूमशान संघटना फुटीकडे नेताना दिसत आहे.

मीच अध्यक्ष : तिदमे

नाशिक म्युनिसिपल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबन घोलप असले तरी त्यांच्याकडे अधिकार नाही. उदय थोरात हे प्रदेशाध्यक्ष आहे. संघटनेच्या प्रमुख पदावरून एखाद्याला निष्कासित करायचे असेल तर संघटनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात निर्णय घ्यावा लागतो. मात्र, घोलप यांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचे श्री. तिदमे यांनी सांगितले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला असून, मीच संघटनेचा अध्यक्ष अद्यापही कायम असल्याचे तिदमे यांनी जाहीर केले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com