कामे महाविकास आघाडीची; निवडणूक तयारी राष्ट्रवादीची!

पिंपळगाव बसवंत येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाली.
NCP MLA Dilip Bankar
NCP MLA Dilip BankarSarkarnama

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी तळागाळातील नागरिकांपर्यंत महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनाची माहिती पोहचवावी. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहचवून पक्ष संघटन मजबूत करावे असे आवाहन करीत निफाडचे आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांनी निवडणुकींच्या तयारीला लागा असे स्पष्ट केले.

NCP MLA Dilip Bankar
शिवसेनेचा संकल्प, एक लाख महिलांना रोजगार देणार!

पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. श्री. बनकर पुढे म्हणाले,‘ कोरोना महामारीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेत सामान्य नागरिकांना मदत करावी. आपल्या भागात सामान नागरिकाना कोरोना लसीकरणात येणाऱ्या अडचणी दूर करून संभर टक्के लसीकरण करून घ्यावे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजारसमिती, ग्रामपंचायती विविध कार्यकारी सोसायट्या अशा विविध निवडणुकांच्या तयारीला लागावे.

NCP MLA Dilip Bankar
ST Strike; आज हेकेखोर संपकरी कर्मचाऱ्यांचे मार्ग बंद होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी मनोगतात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या होणाऱ्या ऑनलाइन सभासद नोंदणी अभियानात भाग येऊन आपल्या भागातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची सभासद नोंदणी करून घ्यावी असे आवाहन केले. युवकांचे अध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, मविप्रचे संचालक सचिन पिगळे, राजेंद्र डोखळे, सुरेश खोडे, महिलांच्या अध्यक्ष सुनिता राजोळे, अश्विनी मोगल, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, शिवाजीराजे ढेपले, रामभाऊ माळोदे, बाळासाहेब बनकर विश्वास मोरे, सोमनाथ मोरे, रमेश मंडलिक, गणेश बनकर, संजय मोरे, नंदू सांगळे, बापू कडाळे, विठोबा फडे, वसंत गवळी, राजेंद्र निरगुडे, रवींद्र मोरे, सोपान खालकर, राजेंद्र कुटे, भूषण शिंदे, बापू गडाख, नारायण पोटे, माणिक शिंदे, रामेश्वर जगताप नितीन ताकाटे, नितीन कुशारे आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आपला भाग संपर्कात राहू द्या

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी तालुकाध्यक्ष सर्व सेलचे अध्यक्ष, गटप्रमुख, गणप्रमुख, गावप्रमुख यांनी आपआपल्या भागातील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून पक्षवाढी प्रयत्न करावे असे आवाहन केले. तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, सुरेश मोरे, दतू मुरकुटे, गोकुळ झालटे आदींनी मनोगत व्यक्त केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in