Politics : ''...आम्ही फक्त एकमेकांवर लाईन मारतोय..''; ठाकरे गट-वंचित युतीवर आंबेडकरांची मिश्किल टिप्पणी

Prakash Ambedkar News : देशात सध्या हुकुमशाही, दंडेलशाही सुरू...
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Sarkarnama

Thackeray Group - Vanchit Bahujan Aaghadhi Alliance : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीसंदर्भात चर्चा सुरु आहे. आंबेडकरांनी मध्यंतरी आमच्यात जागावाटपांसह सगळं काही निश्चित झालं आहे. फक्त युतीची घोषणा बाकी असून ती उध्दव ठाकरेंनी करावी असं विधानही केलं होतं. तरीदेखील अद्यापही ठाकरे गट आणि वंचित युतीचं भिजत घोंगडंच आहे. याच धर्तीवर आंबेडकरांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटानं आमचा पाठिंबा मागितलेला नाही. शिवसेनंसोबत अद्याप आमचं नातं जमलेलं नाही. आम्ही फक्त एकमेकांवर लाईन मारतोय. सध्या केवळ एकमेकांना खाणाखुणा करणं सुरु आहे अशी मिश्किल टिप्पणी ठाकरे गट व वंचित युतीवर केली.

Prakash Ambedkar
Maharashtra Politics : कोकणात विजय मिळविणारे राजन साळवी आणि शिलेदारांना उद्धव ठाकरेंची शाबासकी

आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. आंबेडकर म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी व्हायला हवं. परंतु, ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही प्रचाराला येत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौरा करण्याला आक्षेप घेत पंतप्रधानपदाची पातळी आता ग्रामपंचायतीपर्यंत आल्याचं त्यांनी सांगितलं. देशात सध्या हुकुमशाही, दंडेलशाही सुरू असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर( Prakash Ambedkar) यांनी केला आहे.

Prakash Ambedkar
Sunil Shelke :...अन् पायी जाणाऱ्या शाळकरी मुलांना खुद्द आमदारांनीच दिली `लिफ्ट`

ठाकरे गटासोबतच्या युतीबाबत घोषणा बाकी...

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आमची युती झाली आहे. मात्र, त्याचा जाहीर खुलासा झालेला नाही. पत्रकार परिषद घेऊन त्याचा जाहीर खुलासा करावा, अशी विनंती आम्ही उद्धव ठाकरेंना केली आहे. मात्र, आधी महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी आम्हाला चर्चा करु द्या असं ठाकरेंनी सांगितलं आहे अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती.

याचवेळी आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मी चांगलेच ओळखतो. शरद पवार यांना महाराष्ट्रात कोणी एवढे ओळखत नसेल तेवढा मी ओळखतो. वंचितला महाविकास आघाडीत घेण्यास या दोन पक्षांकडूनच का-कू केली जात आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे की, हे दोन्ही पक्ष तुम्हांला फसवतील. त्यामुळे आमच्यासोबत युती करण्याबाबत आता उद्धव ठाकरेंनी आणखी थांबू नये असंही आंबेडकर म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com