Rahul Aher With Farmers
Rahul Aher With FarmersSarkarnama

नुकसानीची पाहणी करताना आमदार राहुल आहेर हळहळले!

बेमोसमी पाऊस व धुक्यांमुळे जिल्ह्यातील द्राक्ष, शेतीचे ७० कोटींचे नुकसान

चांदवड : अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकुण पाहणीसाठी आलेले आमदार, पदाधिकारी हळहळले. यंदा नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षांसह सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले. हाती आलेले पीक संपुर्णपणे नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रु तरळले. ते पाहून पाहणीसाठी गेलेले भाजपचे आमदार डॅा. राहुल आहेर (Dr. Rahul Aher) देखील हळहळले.

Rahul Aher With Farmers
राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटेंच्या बैठकीतून शेतकरी निघून गेले

चांदवड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आमदार डॉ. आहेर यांनी बुधवारी राहुड, कळमदरे, सुतारखेडे, निमगव्हाण, डोंगरगाव या गावातील नुकसानीची पाहणी केली. या गावातील जवळपास दोनशे ते तीनशे हेक्टरवरील द्राक्षबागांचे शंभर टक्के नुकसान होऊन अंदाजे ७० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याच नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांची व्यथा व तडे गेलेल्या द्राक्षांसह कोलमडलेल्या शेतकऱ्यांना भेटताना आमदारांनीही हळहळ व्यक्त केली.

Rahul Aher With Farmers
ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही निवडणुका नकोत

विशेषत: चांदवडच्या या पट्ट्यात अर्ली द्राक्ष घेतली जातात. सर्व शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा काढणीला आलेल्या होत्या. अवकाळीचा पाऊस नसता आला तर आज हेक्टरी अंदाचे चारशे क्विंटल द्राक्षाचे उत्पादन निघाले असते. चालू बाजार भावानुसार हेक्टरी पंचवीस ते तीस लाख रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार होते.

मात्र, अवकाळीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा पार चुराडा केला. कर्ज काढून प्रचंड खर्च करून बागा उभ्या केलेल्या आहेत. डोळ्यांदेखत एवढे नुकसान शेतकऱ्यांना सहन होण्यापलीकडचे आहे. अशावेळी आमदारांनी या शेतकऱ्यांना भेटून दिलासा दिला. शासनाकडे पाठपुरावा करून भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

या वेळी त्यांच्यासमवेत भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, गणेश महाले, नामदेव पवार, आण्णा शिंदे, वाल्मिक पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com