सिडको कार्यालयावरून आमदार सीमा हिरेंना शिवसेनेचे आव्हान!

नाशिकचे सिडको कार्यालयाच्या स्थलांतरावरून राजकारण पेटणार?
Sudhakar Badgujar & Seema Hire
Sudhakar Badgujar & Seema HireSarkarnama

सिडको : नाशिक (Nashik) येथील सिडको (CIDCO) महामंडळाचे कार्यालय स्थलांतरित करण्याबाबत १ नोव्हेंबरला परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, सिडको कार्यालय स्थलांतरित झाल्यास सिडको रहिवाशांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याच्या संताप जनक प्रतिक्रिया (Reactions) उमटू लागल्या आहेत. यामध्ये शिवसेनेने (Shivsena) विरोधाचा झेंडा हाती घेतल्याने भाजप (BJP) आमदार सीमा हिरे (MLA Seema Hiray) यांना आव्हान देण्याचा प्रय्तन सुरु आहे. (Politics on Cidco office shifting is will be a serious politics)

Sudhakar Badgujar & Seema Hire
सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे का केले नाही!

भाजपच्या आमदार हिरे यांनी सिडकोचे कार्यलय बंद करण्यासाठी पाठपुरावा केला होता. सिडकोचे काम महापालिकेकडे हस्तांतरीत केल्याने हे कार्यालय बंद करण्यासाठी त्यांचा प्रय्तन होता.

Sudhakar Badgujar & Seema Hire
गुलाबराव पाटील यांवी ठाकरे गटाचा धसका घेतला?

यापूर्वीही २०१७ मध्ये कार्यालय स्थलांतरित करण्याबाबत पत्रक काढण्यात आले असताना आमदार सीमा हिरे व नागरी संघर्ष समिती सिडको यांच्यातर्फे लढा देऊन कार्यालय स्थलांतरास स्थगिती देण्यात आली होती. मात्र, या वेळी सिटी सर्व्हे करून सिडकोवासीयांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासाठीच सिटी सर्व्हे विभाग स्थापित करण्यात आला होता. मात्र, त्यांनीही काम व्यवस्थित न केल्याचा आरोप रहिवासी करत आहेत.

कार्यालय स्थलांतरित झाल्यास नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार असून, सिडको कार्यालय सुरू असताना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागत आहे. तर कार्यालय स्थलांतरित झाल्यास महिने नक्की लागणार व मनःस्ताप सहन करावा लागेल.

सिडको कार्यालयाबाबत परिपत्रक पहिले असून, सिडको महामंडळाचे कार्यालय नाशिक महापालिका प्रशासनास हस्तांतरित करण्यात आले आहे. फारसे काम उरलेले नसून, याबाबत सिडको अधिकारी भूषण चंद्रात्रे यांच्याशी बोलणे झाले असून, कोणत्याही कामासाठी इतर शहरामध्ये जावे लागणार नाही. सर्व सुविधा नाशिकमध्येच उपलब्ध होणार आहेत.

- सीमा हिरे, आमदार

सिडको प्रशासनाने २८ हजार सदनिकांची निर्मिती केली आहे. यामध्ये एक लाख ३५ हजार मतदार सिडको परिसरात राहत असून, आजदेखील त्यांची अनेक कामे प्रलंबित आहेत. टाउन प्लॅनिंगचे अधिकार मनपा प्रशासनाकडे असले तरी सिडको कार्यालयाचा ना हरकत दाखला आजदेखील अनिवार्य आहे. सिडको प्रशासनाचा नाहरकत दाखला मिळाल्याशिवाय कोणतेही कामे करण्यासाठी अंतिम प्लॅन देण्यात येत नाही. सिडको फ्री होल्ड करून सिडको कार्यालय बंद केले तरी हरकत नाही.

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in