राजकारण कचऱ्याचे; आमदार फारूक शाह यांनी स्थगिती आणली, उठवली देखील त्यांनीच!

`एमआयए`चे आमदार फारूख शाह यांनी हरकत कायम ठेवत पाठपुरावा केला.
राजकारण कचऱ्याचे; आमदार फारूक शाह यांनी स्थगिती आणली,  उठवली देखील त्यांनीच!
MLA Farooq ShaikhSarkarnama

धुळे : महापालिकेतील कचऱ्याचे कंत्राट व त्याच्या निविदांचा कारभार म्हणजे राजकीय नेत्यांच्या थेट सहभाग व कोटीच्या निविदांचा खेळ झाला आहे. भाजप व शिवसेनेचे नेते त्यात पार्टनर असल्याचा आरोप त्यांनी एकमेकांवर केला आहे. आता त्यात `एमआयएम`चे आमदार फारूख शहा (MLA Farooq shaikh) यांनी उडी घेतली आहे. नवे कंत्राट देऊ नये यासाठी त्यांनी स्थगिती आणली आता त्यांनीच ती उठवली आहे. त्यामुळे दुळे शहरात राजकारणाला विषय ठरला तो कचरा!

MLA Farooq Shaikh
महाराष्ट्राचा यूपी, बिहार झाला की काय? असे वाटायला लागले आहे!

शहरातील कचरा संकलनासाठी नियुक्त नवीन कंत्राटदाराला कार्यादेश देण्यावर दिलेली स्थगिती अखेर शासनाने उठविली आहे. तसे पत्र महापालिकेलाही प्राप्त झाले आहे. शासनाच्या पत्रामुळे शहरातील कचरा संकलनाचे काम मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने कार्यादेश देण्यासाठी अडसर येण्याची शक्यताही वर्तविली जाते. आमदार फारूक शाह यांनी स्थगिती मिळविल्यानंतर जनहितासाठी पुन्हा स्थगिती उठविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला.

MLA Farooq Shaikh
धक्कादायक, भाजपच्या सत्तेत कचऱ्यात दरमहा ९० लाखांचा भ्रष्टाचार!, पैसा जातो कुठे?

महापालिका क्षेत्रात कचरा संकलनासाठी प्रशासनातर्फे निविदा प्रक्रिया राबविली. प्रक्रियेअंती स्वयंभू ट्रान्सपोर्ट (पुणे) या कंपनीला कचरा संकलनाचे काम मिळाले. मात्र, निविदा प्रक्रियेच्या अनुषंगाने शहराचे आमदार फारूक शाह यांनी शासनाकडे तक्रार केली होती. गेल्या कंत्राटदाराच्या तुलनेत अधिक दराने निविदा दिली गेली. याबाबत तक्रारीमुळे शासनाने कचरा संकलनासाठी कार्यादेश देण्यास २० सप्टेंबर २०२१ ला स्थगिती दिली. त्यामुळे काही महिन्यांपासून शहरातील कचरा संकलनाचा बोजवारा उडाला. परिणामी, तक्रारी वाढल्या, सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. मनपा सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत स्थगिती उठविण्याची मागणी केली, तसेच आमदार शाह यांनीही स्थगिती उठविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन झाले. त्यानंतर काही दिवसांत स्थगिती उठविल्याचे आमदार शाह यांनी सांगितले. मात्र, महापालिकेला अधिकृत पत्र न मिळाल्याने स्थिती ‘जैसे थे’ होती.

अखेर पत्र मिळाले

अखेर गुरुवारी कचरा संकलनासाठी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यावरील स्थगिती उठविल्याचे शासनाच्या नगरविकास विभागाचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले. महापालिकेच्या अहवालानुसार स्वयंभू ट्रान्सपोर्ट (पुणे) कंपनीस कार्यादेश देण्यास दिलेली स्थगिती उठविण्यात येत आहे, नियमानुसार पुढील आवश्‍यक कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. करारनाम्यासह इतर आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करून येत्या दहा-१५ दिवसांत नवीन कंत्राटदाराकडून काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, स्वयंभू कंपनीला अधिक दराने कंत्राट दिल्याने याविषयी हरकत व तक्रार कायम ठेऊन, तसेच शासनाने चौकशी समिती नेमून याप्रश्‍नी शहराचे हित साधावे, अशी मागणी आमदार शाह यांनी केली आहे.

...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in