Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

महाराष्ट्रात विरोधकांना शत्रु समजण्याची संस्कृती आली आहे!

एका वाहिनीवरील चर्चेत छगन भुजबळ यांनी सध्याच्या राजकारणाबाबात खंत व्यक्त केली.

नाशिक : महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांपासून तर विविध एक राजकीय सुसंस्कृतपणा (Cultured Politics) निर्माण केला. पंडीत जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) आधी विरोधकांना नमस्कार करीत. आता मात्र ही संस्कृती काही नेत्यांनी लोप पावत चालली आहे. विरोधकांना राजकीय विरोधक नव्हे तर शत्रू मानले जात आहे. ठोकण्याची भाषा केली जात आहे, अशी खंत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली.

Chhagan Bhujbal
`एमपीएससी`ची गती, सात वाजता मुलाखती, आठला नियुक्ती!

एका वाहिनीवरील माझा कट्टा या व्यासपीठावर श्री. भुजबळ आणि सौ. मीनाताई भुजबळ यांची मुलाखत झाली. यावेळी आजच्या राजकीय स्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी माहिती दिली.

Chhagan Bhujbal
राज ठाकरे ‘एजंट’ चे काम करतात!

ते म्हणाले, पूर्वी काँग्रेसचे राज्य होते. विरोधी पक्षातही तेव्हढीच दिग्गज मंडळी होती. मात्र त्यात एक राजकीय सुसंस्कृतपणा होता. पंडीत जवाहरलाल नेहरू संसदेत आल्यावर आधी विरोधी पक्षाला नमस्कार करीत, नंतर सत्ताधारी पक्षाला नमस्कार करायचे.

महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांनी ही परंपरा निर्माण केली. केशवराव धोंडगे, मृणाल गोरे, दत्ता पाटील, दी. बा. पाटील अशी दिग्गज मंडळी विरोधी पक्षात होती. चव्हाण साहेब सभागृहात आल्यावर आधी विरोधी पक्षांना नमस्कार करीत असत. कितीही टोकाची टीका, चर्चा, आक्षेप झाले तरीही कोणाच्या मनात आकस नसे. त्यानंतर लगेच ही मंडळी चहाला भेटत. चर्चा करीत असत. कोणी अडचणीत असेल तर त्याला मनापासून मदत केली जायची. शासकीय मदत असे तशीच प्रसंगी स्वतः आर्थिक झळ सोसून मदत करण्यात येत असे. राजकीय विरोधक म्हणून कोणाबाबत शत्रुत्वाची भावना नव्हती.

सध्या महाराष्ट्रात जे घडते आहे, त्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, सध्या राजकीय विरोधकांना शत्रुत्वाची वागणूक मिळते. त्यांच्या कशा नाड्या आवळायच्या इथपासून तर अगदी घरादारापर्यंत पोहोचतात. त्यासाठीचार-पाच लोकांना हेच काम दिलेले असते. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही.

यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेचे राजकारण केले असे भुजबळ म्हणाले. चव्हाण साहेब प्रत्येकाला प्रेमाचीच वागणूक देत असत. महाराष्ट्र हा देशाला अतिशय मोठा आदर्श वाटावा असा आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे, तसेच महात्मा फुले, डॅा. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज यांनी या राज्याला एक वैचारीक नेतृत्व दिले आहे. बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर अत्यंत कडक टिका करीत असत. मात्र त्यानंतर ते सायंकाळी एकमेकांना भेटत असत. चर्चा करीत असत. आज चर्चेपेक्षा ठोकण्याची भाषा केली जाते. याला ठोकला, त्याला ठोकला. या स्तरावर राजकारण नेऊन ठेवले आहे.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com