एकनाथ खडसेंच्या कुटुंबात महाभारताचा पहिला अध्याय लवकर सुरु झाला!

जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुक प्रकियेत आज अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे.
NCP leader Eknath Khadse
NCP leader Eknath KhadseSarkarnama

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांच्या कुटुंबात राजकीय महाभारताच्या अध्यायाला सुरवात झाली आहे. (Political Mahabharat in his family) जिल्हा बॅंक निवडणुकीच्या निमित्ताने ते सुरु झाले. आता कार्यकर्त्यांपुढे प्रचार कोणाचा अन् समर्थन कोणाचे करायचे हे धर्मसंकट आहे. त्यामुळेच जळगावचे हे राजकीय महाभारत चांगलेच चर्चेत आहे.

NCP leader Eknath Khadse
रुद्रप्रयागला अडकलेल्या ३५ भाविकांची खासदार गोडसेंच्या प्रयत्नांनी सुटका!

महाभारताचे युद्ध अठरा दिवस चालले होते. त्यात दिवसभर सैनिक लढायचे व सुर्यास्तानंतर एकमेकांच्या जखमांची मलमपट्टी करायचे. जळगावमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपने काँग्रेसला अगदीच नगण्य लेखण्याची चुक करीत त्यांची एका जागेवर बोळवण करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे गिरीश महाजन यांना तर काँग्रेसला हवी असलेल्या जागेवर देखील आपल्या समर्थकाची वर्णी लावायची होती. त्यातून काँग्रेसने केलेल्या स्वबळाच्या घोषणेने एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांचे राजकीय डावपेच उधळले गेले. त्यात खरी परिक्षा असेल ती भाजपच्या खासदार रक्षा खडसे (सून) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (सासरे) यांची. सध्याचे राजकीय वारे आणि भाजपकडून खडसे यांची ज्या पद्धतीने छळवणूक सुरु आहे, त्यात त्यांचे समर्थक व नागरीक भाजपवर संतापलेले आहेत. मात्र खासदार रक्षा खडसे यांची कारकीर्द भाजपमुळे की खडसेंमुळे हा नवा प्रश्न व त्याचे उत्तर दोन्ही येत्या दहा बारा दिवसांतच निकाली निघण्याची शक्यता आहे.

NCP leader Eknath Khadse
अजित पवारांच्या जादूच्या कांडीने बालेकिल्ल्यातच काँग्रेस धाराशायी!

एकाच घरात दोन भिन्न राजकीय पक्षांचे समर्थक हे आता नवे राहिलेले नाही. अनेक राजकीय परिवार, शहरांत असेच राजकारण होताना दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे यांच्याबाबत देखील सध्या तेच सुरु आहे. मात्र किमान लोकसभा, विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी घरातल्यांचा एकमेकांशी राजकीय सामना होईल असे वाटत नव्हते. योगायोगाने हा सामना अपेक्षेपेक्षा खुप लवकर झाला. सर्वपक्षीय पॅनेल असते तर हे सगळे `झाकली मुठ` राहिली असती. मात्र आता शंखध्वनी झाला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली, तर खासदार रक्षा खडसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अशी सासरा विरुद्ध सून अशी लढत जिल्हा बँकेत होण्याची शक्यता आहे.

भाजप स्वतंत्र लढणार

जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपसोबत पॅनल करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भाजप ही निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहे. सर्व २१ जागांवर भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी रविवारी ही माहिती दिली.

यावेळी श्री. महाजन म्हणाले, जिल्हा बँक निवडणूक लढविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. यात सर्व २१ जागांवर भाजपचे उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत आघाडी न झाल्यास भाजप स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अद्यापही ते माघारीपर्यंत आम्ही आघाडीवर ठाम आहोत. मात्र, काहीच निर्णय न झाल्यास आम्ही सर्व २१ जागांवर उमदेवार उभे करणार आहोत. खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ या वेळी उपस्थित होते.

मी लढणार : रक्षा खडसे

पक्षाचा आदेश असल्याने आपण जिल्हा बँक संचालक निवडणुकीत उतरणार आहोत, असे मत खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, सर्वपक्षीय पॅनलसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याला यश येत नाही. त्यामुळे आपल्या पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊन आपल्याला लढण्याचा आदेश दिल्यास आपण निवडणूक लढविणार आहोत.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com