नाशिकमध्ये भाजपाला धक्का?, "माहिती पत्रका"तून उपमहापौर गायब!

भारतीय जनता पक्षाच्या एका उत्साही पदाधिकाऱ्यांकडून सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिडको परीसरात मतदारांना मोठ्या प्रमाणात महिती पत्रकांचे वाटप करण्यात येत आहे.
Bhikubai Bagul, Dy Mayor Nashik
Bhikubai Bagul, Dy Mayor NashikSarkarnama

सिडको : भारतीय जनता पक्षाच्या (BJP office bearer distribute a Brochure for election in which Seating Dy Mayor`s name & Photo Missing) एका उत्साही पदाधिकाऱ्यांकडून सध्या महापालिका निवडणुकीच्या (Upcoming NMC Election political drive) पार्श्वभूमीवर सिडको परीसरात मतदारांना मोठ्या प्रमाणात महिती पत्रकांचे वाटप करण्यात येत आहे. परंतु या पत्रकात प्रोटोकॉल मध्ये नाशिक महापालिकेत महत्वाचे पद भूषवित असलेल्या स्व:पक्षाच्या उपमहापौरांचाच "फोटो" गायब आहे. सध्या हा विषय नागरिकांमध्ये चर्चेचा विषय आहे.

Bhikubai Bagul, Dy Mayor Nashik
भाजपला रसद कोण पुरवतेय हे राज्य सरकारने शोधले पाहिजे!

नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सिडको परिसरात विविध राजकिय व सामजिक कार्यक्रमाना अक्षरशः ऊत आला आहे. अशातच सिडको परिसरातील भारतीय जनता पक्षाच्या एका अती उत्साही पदाधिकाऱ्याकडून सध्या हजारो "माहिती पत्रका" चे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात येत आहे. पण जेव्हा हे माहितीपत्रक नागरिकांच्या हातात पडत आहे, तेव्हा "प्रोटोकॉल" मध्ये दस्तरखुद्द त्यांच्याच पक्षाच्या उपमहापौरांचा फोटो गायब झाल्याने या पदाधिकाऱ्याच्या कर्तबगारी बाबत सिडकोत चांगलेच चर्चेला उधाण आले आहे. सदर प्रकार हा अनवधानाने, मुद्दामून की यामागे बोलविता धनी दुसराच कोणी आहे 0 याबाबत मात्र पुरेसी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र असे असले तरी नगरसेवक पदासाठी नव्याने उभे राहण्याची महत्त्वाकांक्षा मनाशी बाळगून असलेल्या या इच्छुक उमेदवारास स्वपक्षाचेच उपमहापौर कोण? हे माहीत नसेल तर मग त्या उमेदवाराचा नागरिकांनी भाविष्यात काय म्हणून विचार करावा? असाही प्रश्न यानिमत्ताने मतदार उपस्थित कारीत आहे.

Bhikubai Bagul, Dy Mayor Nashik
आता फक्त मोदींच्या खुर्चीचा लिलाव बाकी आहे!

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे उमेदवार हे हेवेदावे विसरून व सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवित असल्याचे आतापर्यंत बघायला मिळाले आहे . यामध्ये कोणी नाराज होणार नाही याची काळजी नक्कीच घेतली जाते. परंतु निवडणुकीपूर्वीच अशा प्रकाराच्या चुकीमुळे व वादग्रस्त मुद्याने हा विषय नागरिकांसाठी चांगलाच चर्चेचा ठरू पाहत आहे.

उपमहापौर कोण आहेत?

भिकुबाई बागूल या विद्यमान उपमहापौर व महापालिकेच्या वय व अनुभवाने सर्वात ज्येष्ठ आहेत. सध्या त्या ८० वर्षाच्या आहेत. त्या सलग तीन वेळा रामवाडी पिरसरातून विजयी झाल्या आहे. त्यांचा सर्व आदर करतात. कामगार, रिक्षाचालक व टॅक्सीचालक संघटनेच्या श्रमीक सेनेचे सुनिल बागूल यांच्या त्या मातोश्री आहेत. सध्या श्री. बागूल यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. याचा अर्थ भाजपचा एक ज्येष्ठ व प्रभावी नगरसेवक गळाला की काय? या चर्चेला निमित्त मिळाले आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com