महाराष्ट्रात राजकीय भूकंप; एकनाथ शिंदेंसह सेनेचे 17 आमदार बंडाच्या तयारीत

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर मोठे राजकीय संकट निर्माण झाले.
Eknath Shinde News in Marathi
Eknath Shinde News in MarathiSarkarnama

मुंबई : विधान परिषदेच्या (Maharashtra) निकालाचा परिणाम राज्याच्या राजकारणात होत आहे. त्याचा पहिला दणका शिवसेनेला (Shivsena) बसला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे 17 आमदारांसह सुरतमध्ये एका हॅाटेलमध्ये असल्याची चर्चा आहे. (Shivsena Minister Eknath Shinde not reachable)

Eknath Shinde News in Marathi
एकनाथ खडसेंच्या विजयाने तापी खोऱ्यात ‘दिवाळी’

महेंद्र थोरवे, भारत गोगावले, महेश शिंदे, विश्वनाथ भोईर, ज्ञानराज चौगुले, संजय राठोड, श्रीनीवास वनगा, संजय गायकवाड, संजय रायमूलकर हे आमदार नाराज असून त्यांनी शिंदे यांची साथ देण्याचे ठरविल्याचे बोलले जात आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार, बालाजी किणीकर, शांताराम मोरे, अनिल बाबर, तानाजी सावंत, संजय शिरसाठ हे पण शिंदे यांच्या सोबत असल्याचे सांगण्यात आले. (Eknath Shinde News in Marathi)

Eknath Shinde News in Marathi
आमदार कुणाल पाटील यांचा भाजपला `जोर का झटका`

विधान परिषद निकालात शिवसेनेची तेरा मते फुटली होती. सेनेचे दोन्ही उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे काठावर जिंकून आले होते. निकालानंतरच एकनाथ शिंदे नॅाट रिचेबल झाले होते, तसेच वर उल्लेख केलेल्या आमदारांचाही संपर्क होत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. ठाकरे सरकारवर मोठे संकट आले आहे. शिंदे हे आज दुपार नंतर गुजरातमध्येच माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com