Ahmednagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग; नगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात राजकारण तापण्याची शक्यता
BJP, NCP , 
Congress
BJP, NCP , CongressSarkarnama

Politics : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ८ मार्चला पार पडली.

यामध्ये भाजपचे कर्डीले विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे घुले यांचा पराभव झाला. यानंतर मात्र, जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत संचालकांचे संख्याबळ असतानाही राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाला. संचालकांचे संख्याबळ कमी असतानाही भाजपचे शिवाजी कर्डिले यांची बँकेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली.

चंद्रशेखर घुले यांचा या निवडणुकीत झालेला पराभव हा त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याची चर्चा आहे. एवढंच नव्हे तर घुले राष्ट्रवादी (NCP) सोडणार असल्याची चर्चाही आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

BJP, NCP , 
Congress
Shivsena : सातारा लोकसभेसाठी शिवसेना सक्षम उमेदवार देणार... राजेश क्षीरसागर

अवघ्या एका मताने बँकेचे अध्यक्षपद हुकल्यामुळे चंद्रशेखर घुले चांगलेच व्यथित झाले. त्यांनी काही निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यानंतर उद्या (दि.१४ मार्च) शेवगावमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात आपली भूमिका ते स्पष्ट करणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

त्यामुळे चंद्रशेखर घुले काही वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून काही राजकीय उलधापालथ होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BJP, NCP , 
Congress
NCP : कोरेगाव- खटावमध्ये वाद पेटवण्यासाठी त्यांचे घाणेरडे राजकारण : शशिकांत शिंदे

दुसरीकडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीतून लोकसभा लढवण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचं टेन्शन वाढलं आहे.

तर कर्जत-जामखेडमध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी फडवीसांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला.

दरम्यान, आगामी निवडणुका पाहता अहमदनगर जिल्ह्यात आजापासूनच राजकीय घडमोडी वेगाने घडत असल्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com