आदिवासी मुली म्हणाल्या, आम्हाला तुमची खुर्ची नको, आर्शिवाद द्या!

आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची मागण्यांसाठी तळोदा येथे आठ तास पायपीट
Trible girls going to Taloja by Walk
Trible girls going to Taloja by WalkSarkarnama

तळोदा : आपल्या विविध समस्यांबाबत मांडवी (ता. धडगाव) येथील आश्रमशाळेतील (Resident school) जवळपास पन्नास विद्यार्थिनींनी तब्बल आठ तासांची पायपीट करीत, साठ किलोमीटर अंतर कापत तळोदा (Taloda Trible project) प्रकल्प कार्यालय गाठले व आपल्या मागण्या प्रकल्प अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या कानावर घातल्या. प्रकल्प अधिकारी डॉ. घोष यांनी विद्यार्थिनींच्या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन देत, तळोदा प्रकल्पांतर्गत अनेक आश्रमशाळांमध्ये विषय शिक्षकांची कमतरता असल्याचे मान्य केले.

Trible girls going to Taloja by Walk
खडसेंनी विचारले, अशा डाकू आमदाराला तीस वर्षे निवडून कसे दिले?

मांडवी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेतील मुलींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. याबाबत मुख्याध्यापकांना सांगूनसुद्धा समस्या मार्गी न लागल्याने विद्यार्थिनींनी थेट प्रकल्प कार्यालय गाठण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी (ता. २२) पहाटे सहालाच जवळपास ५० विद्यार्थिनी मांडवी येथून निघाल्या. तब्बल आठ तासांची पायपीट केल्यावर साठ किलोमीटरचे अंतर कापत, त्या तळोदा प्रकल्प कार्यालयात पोचल्या. तेथे जवळपास अर्धा तास ठिय्या दिल्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात तीन विद्यार्थिनींना प्रकल्प अधिकाऱ्यांच्या दालनात बोलविण्यात आले. त्या वेळी विद्यार्थिनींनी आपल्या विविध समस्यांबाबत प्रकल्प अधिकारी डॉ. घोष यांना अवगत केले.

Trible girls going to Taloja by Walk
भेदभाव सोपा, सर्वांना बरोबर घेण्याची क्षमता केवळ काँग्रेसकडे!

आश्रमशाळेचे मुख्याध्यापक वेळेवर हजर राहत नसून, विद्यार्थिनींच्या समस्यांचे निराकरण करीत नाहीत. दोन वर्षांपासून डीबीटी विद्यार्थिनींच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे शैक्षणिक साहित्य घेण्यात अडचणी आल्या, तसेच अनेक विषयांचे शिक्षक नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा अनेक समस्या प्रकल्प अधिकारी डॉ. घोष यांच्यासमोर मांडत, त्यांना याविषयी निवेदन देण्यात आले. तहसीलदार गिरीश वखारे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शैलेश पटेल, आदिवासी युवाशक्तीचे विनोद माळी, चेतन शर्मा व ॲड. रूपसिंग वसावे आदी या वेळी उपस्थित होते.

प्रकल्प अधिकाऱ्यांचे मोठेपण

प्रकल्प अधिकारी डॉ. घोष यांनी मांडवी येथून आलेल्या विद्यार्थिनींपैंकी प्रातिनिधिक स्वरूपात तीन विद्यार्थिनींना आपल्या दालनात बोलवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण केले. त्यानंतर प्रकल्पधिकारी डॉ. घोष यांनी त्या विद्यार्थिनींना आपल्या खुर्चीवर बसण्यास सांगून आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला. मात्र, विद्यार्थिनींनीदेखील नम्रपणे नकार देत त्यांचे आशीर्वाद घेतले. ही घटना बघून उपस्थित असलेले सगळेच अवाक्‌ झाले.

मांडवी आश्रमशाळेत भौतिकशास्त्र, भूगोल, इतिहास या विषयांचे शिक्षक नाहीत. मुली जास्त असल्याने स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता असून, लॅपटॉप उपलब्ध करून द्यावेत.

-प्रिया पावरा, विद्यार्थिनी, मांडवी आश्रमशाळा

--

डीबीटीचा विषय कमिशनर लेव्हलला पेंडिंग आहे. तळोदा प्रकल्पांतर्गत अनेक आश्रमशाळांमध्ये विषय शिक्षकांची कमतरता आहे. शासन नियमानुसार जे शक्य आहे, ते विद्यार्थिनींच्या भल्यासाठी करण्यात येईल. स्वयंपाकाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी एका अतिरिक्त कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल.

-डॉ. मैनाक घोष, प्रकल्पधिकारी, तळोदा

--

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com