Nashik News: उत्सवादरम्यान नियमांचे उल्लंघनाचे ४२ गुन्हे मागे घेणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली होती.
Police logo
Police logoSarkarnama

नाशिक : गेल्या काही वर्षातील गणेशोत्सव, दहीहंडी आदी उत्सवादरम्यान कायदेशीर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील दाखल गुन्ह्यांपैकी ४२ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर, दहा गुन्ह्यांचे स्वरूप गंभीर स्वरूपाचे असल्याने त्यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया नियमित होणार आहे. (42 crime registered against political workers will be withdraw)

Police logo
BJP News: काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणा!

गणेशोत्सव, दहीहंडी उत्सवादरम्यान कायदेशीर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या संदर्भातील आदेश राज्य शासनाने जारी केले असून, या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील दाखल गुन्ह्यांच्या माहितीचे संकलन करण्यात आले. सदरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मागणी लोकप्रतिनिधींकडून शासनाकडे सातत्याने मागणी केली जात होती.

Police logo
NCP News: बावनकुळे यांनी आधी आपली राजकीय उंची तपासावी!

त्यानुसार राज्य शासनाने सदरील आदेश पारित केले आहेत. सदर गुन्हे मागे घेताना मात्र गुन्ह्यांचे स्वरूप पाहून ते मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या उत्सवांत दाखल गुन्ह्यांचे स्वरूप तपासण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली, तर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली होती. या समितीमार्फत केवळ गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत.

अटी-शर्ती

गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवात कायदेशीर सूचनांचे उल्लंघनमुळे ज्या गुन्ह्यांत ३१/०३/२०२२ पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत, असे गुन्हे मागे घेतले जातील. तसेच, हे खटले केवळ गणपती व दहीहंडी उत्सवाच्या कालावधीत कायदेशीर सूचनांचे उल्लंघन झाल्यामुळे दाखल असावेत, अशा घटनेत जीवितहानी झालेली नसावी. तसेच, खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे ५ लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे. पोलिस आयुक्तालय हद्दीतील विविध पोलिस ठाण्यांतर्गत अशा स्वरूपाचे ५२ गुन्हे दाखल होते. त्यापैकी ४२ गुन्हे मागे घेतल्याने अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. तर, १० गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असल्याने ते मागे घेण्यात आलेले नाहीत.

शासनाच्या आदेशानुसार पोलिस आयुक्तालयांतर्गत ५२ गुन्हे दाखल होते. त्यापैकी ४२ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.

- संजय बारकुंड, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in