भोंग्यांचा आवाज मोजण्याचे आदेश!

विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या सूचनेवरून विभागात अंमलबजावणी
B. G. Shekhar, IPS, Nashik Latest News Updates, Nashik Loudspeaker Controversy News Updates
B. G. Shekhar, IPS, Nashik Latest News Updates, Nashik Loudspeaker Controversy News UpdatesSarkarnama

नाशिक : भोंग्यावरुन (Loudspeakers) राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे. यातच नाशिक परिक्षेत्रात (Nashik region) देखील कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नये, यासाठी विशेष पोलिस (police) महानिरीक्षक यांच्याकडून खबरदारीचे उपाय होती घेण्यात आले आहेत. यात शहराप्रमाणे परिक्षेत्रातही भोंगे वाजविण्यापूर्वी परवानगी आवश्‍यक करण्याच्या सूचनेसह भोंग्याच्या आवाजाची मर्यादा मोजण्याचे आदेश विभागातील सर्व अधीक्षक यांना विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर- पाटील (B. G. shekhar patil) यांनी दिले आहेत. (Nashik Latest News Updates)

B. G. Shekhar, IPS, Nashik Latest News Updates, Nashik Loudspeaker Controversy News Updates
छगन भुजबळांच्या मतदारसंघातील लासलगावला १५ दिवसांतून एकदा पाणी!

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी करीत ३ मे पर्यंत भोंगे न उतरवल्यास मंदिरांवर भोंगे लावून त्यावरून हनुमान चालिसा लावली जाईल, असा इशारा दिला. त्यापार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिस आयुक्त यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व धार्मिक स्थळांवर असलेले भोंगेबाबत परवानगी घेण्याचे आदेश काढले आहेत. ३ मे पर्यंत भोंगे लावण्यास लेखी परवानगी घेण्याचे आदेश दिले असून मशिदींच्या १०० मीटर जवळील परिसरात भोंगे लावण्यास बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितास कारावास, आर्थिक दंडाची शिक्षा किंवा तडीपारी किंवा प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा इशारा श्री.पांडे यांनी दिला आहे. भोंग्यांची ध्वनी तीव्रता मोजण्यासाठी देखील पावले उचलले आहे.

B. G. Shekhar, IPS, Nashik Latest News Updates, Nashik Loudspeaker Controversy News Updates
लांबलेल्या निवडणुकांमुळे नेत्यांमध्ये अस्वस्थता!

नाशिक परिक्षेत्रात देखील विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर-पाटील यांनी खबरदारीचे आदेश दिले आहेत. भोंगे वाजविण्यासाठी परवानगी आवश्यक असेल, ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन करू देऊ नका, दोन गटात तेढ निर्माण करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा तसेच सोशल मिडियावर वादग्रस्त संदेश अपलोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करत ते संदेश तत्काळ मिटविण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. त्यामुळे विशेष शाखांमार्फत प्राप्त गोपनीय अहवालांनुसार पोलिसांची संपूर्ण यंत्रणा खबरदारी बाळगत आहे. वाद उद्भवू नयेत म्हणून शहरासह पाचही जिल्ह्यांत अलर्ट देण्यात आला आहे. या आदेशानुसार नाशिक ग्रामीण भागात सूचनांची अंमलबजावणीस सुरवात करण्यात आली आहे.

ग्रामीण पोलिसांकडून अंमलबजावणी

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार परिसरनिहाय आवाजाची क्षमता राखून भोंग्याचा आवाज मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी (ता.१९) सय्यदपिंप्री (ता.नाशिक) परिसरातील मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाची तीव्रता प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोजली. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवासी, वाणिज्य, औद्योगिक व शांतता परिक्षेत्रानुसार दिवसा व रात्रीची आवाजाच्या पातळीची तीव्रता आखून दिली आहे. या पातळीच्या आत आवाज ठेवणे बंधनकारक आहे.

...

सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम पाळण्याच्या उद्देशाने व परिक्षेत्रात कुठलाही जातीय तेढ निर्माण होणार नाही या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व अधीक्षक यांना आवश्‍यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणीस देखील सुरवात झाली आहे.

- डॉ. बी. जी. शेखर पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com