नाशिकमध्ये ३९ मशिदींना अजानची परवानगी नाकारली!

नाशिक शहरात मशिदींवरील भोंग्यांना एकही परवानगी देण्यात आली नाही.
Loudspeaker controversy news in Marathi, Nashik News Updates, Nashik News in Marathi
Loudspeaker controversy news in Marathi, Nashik News Updates, Nashik News in MarathiSarkarnama

नाशिक : राज्यात (Maharashtra) बहुतांशी धार्मिकस्थळांना भोंगे वाजविण्याची परवानगी नसल्याने पुणे, (Pune) मुंबईत (Mumbai) भोंग्यांना परवानगी देण्याची प्रक्रीया सुरु आहे. नाशिक शहरात मात्र पोलिसांनी (Police) अद्याप भोंगा वाजविण्यासाठी एकही परवानगी देण्यात आलेली नाही. (Loudspeaker controversy news in Marathi)

Loudspeaker controversy news in Marathi, Nashik News Updates, Nashik News in Marathi
मशिदीसमोर घोषणा देणाऱ्या मनसे नेत्यांना अटक!

यासंदर्भात आजपर्यंत मशिदी, मंदिराकडून परवानगीसाठी ६० अर्ज आले आहेत. या अर्जाची छाननी करण्यात आली. त्यात ३९ अर्ज पहाटे ५ वाजेपासून अजानची परवानगी मागितल्याने बाद करण्यात आले. तर काहींचे बांधकाम महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसल्याने या त्रुटींची पुर्तता करण्यास सांगण्यात आले.

Loudspeaker controversy news in Marathi, Nashik News Updates, Nashik News in Marathi
नवनीत राणांना जे. जे. रुग्णालयात हलवलं! आजच जामिनाचा निकाल लागणार

शहरात आज पहाटे २९ पदाधिकरी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात पाच महिलांचा समावेश आहे तर दोन ठिकाणी स्पीकर जप्त करण्यात आले. शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून सर्व मशिदींच्या परिसरात तपासणी करण्यात येत आहे. शंभराहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिस अधिनियम १४९ च्या नोटिस तसेच १६ जणांना कलम १४४ नुसार तडीपारीच्या नोटिस बजावल्याने पोलिस सतर्क झाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवर असलेले अनाधिकृत भोंगे उतविण्या संदर्भात दिलेल्या अल्टीमेटम आज संपत असल्याने नाशिक शहर व ग्रामीण पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणारी नाही याची पोलीस यंत्रणेकडून पुरेपुर काळजी घेतली जात असून त्यादृष्टीने शहर व जिल्ह्यात पोलीसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांना नोटीसा देखील बजाविण्यात आल्या आहे.

या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयाकडून शहरात ३ हजार पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आला आहे. यासह राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या देखील शहरात तैनात करण्यात आल्या आहे. गृहरक्षक दलाचे ६०० जवान शहरात पोलिसांच्या मदतीसाठी बंदोबस्तात लावण्यात आलेले आहे.

जिल्ह्यातही चोख बंदोबस्त

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यात देखील शांतता रहावी म्हणून नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकडून संपूर्ण जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी ३ हजार पोलीसांचा फौजफाटा, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या आणि गृहरक्षक दलाचे १ हजार १०० जवान बंदोबस्त ठेवणार आहे. शहर पोलिसांप्रमाणे जिल्ह्यातून १५० हून अधिक मनसे पदाधिकारी यांना ग्रामीण पोलीसांकडून नोटीस बजाविण्यात आल्या आहे.

...

कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

- जयंत नाईकनवरे, पोलिस आयुक्त, नाशिक.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com