Nashik News: नाशिकचे शासकीय विश्रामगृह बनले गुन्हेगारांचे आश्रयस्थान?

नाशिक पोलिसांकडून शासकीय विश्रामगडहातून गुन्ह्यातील दुचाकी जप्त करण्यात आल्या
Shivsena leader Bala Kokane & seize bikes of criminals
Shivsena leader Bala Kokane & seize bikes of criminalsSarkarnama

नाशिक : शिवसेना (Shivsena) पदाधिकारी नीलेश ऊर्फ बाळा कोकणे (Bala Kokane) यांच्यावर हल्लाप्रकरणी पाचव्या संशयितास अंबड येथून अटक झाली. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी आणि हत्यार जप्त करण्यात आले. या सराईत गुन्हेगारांनी आपली वाहने चक्क शासकीय विश्रामगृहात दडवली होती. त्यामुळे त्यांना कोणाचे संरक्षण आहे,याची चर्चा रंगली आहे. (who supports criminals involve in Shivsena leader deadly attack)

Shivsena leader Bala Kokane & seize bikes of criminals
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे `मालेगाव`च्या ट्रॅपमध्ये अडकणार!

गुरुवारी भद्रकाली पोलिसांनी मनोज पाटील, पंकज सोनवणे, सूरज राजपूत, सागर दिघोळे अशा चौघा संशयितांना गडकरी चौक येथून अटक केली. अन्य दोघे संशयित फरारी होते. फरारी संशयितांपैकी आकाश फडके यास गुन्हे शोध पथकाकडून शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अंबड येथून ताब्यात घेतले. अटक संशयितांची संख्या पाच झाली असून, अद्याप एक संशयित फरारी आहे.

Shivsena leader Bala Kokane & seize bikes of criminals
Sharad Pawar: सरकार केव्हा पडेल हे सांगायला मी ज्योतिषी नाही!

दरम्यान, संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या (एमएच १५, ईएन ०२०५), (एमएच १५, जीबी ४३९३), (एमएच १५, एफबी ३८६४) अशा तीन दुचाकी, लाकडी दांडके पोलिसांनी हस्तगत केले. उपनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून लावलेल्या फलकावर शाही फेक आंदोलन केल्याप्रकरणी हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दरम्यान, मनोज पाटील, पंकज सोनवणे, सूरज राजपूत, सागर दिघोळे संशयितांना न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कुठली सुनावण्यात आली आहे. चौघा संशयितांवर खून, खंडणी अशा विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

शासकीय विश्रामगृहाचा आधार

बाळा कोकणे यांच्यावर हल्ला केल्यानंतर संशयितांनी चक्क शासकीय विश्रामगृहाचा आधार घेतला. काही वेळ थांबून गुन्ह्यात वापरलेल्या तीनही दुचाकी विश्रामगृहाच्या आवारात पार्क केल्या. शुक्रवारी पोलिसांनी विश्रामगृहातून तीनही दुचाकी हस्तगत केल्या. या घटनेतून शासकीय विश्रामगृहाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट होत आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in