Dr. Nilam Gorhe: पिडितेच्या पालकांवर दबाव टाकणारे `ते` पोलिस कोण?

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढाकार घेत पीडितेच्या पालकांवर सहीसाठी दबाव असल्याची माहिती दिली.
Dr. Nilamtai Gorhe
Dr. Nilamtai GorheSarkarnama

नाशिक : खडक्या (ता. धडगाव) (Nandurbar) येथील पीडितेवर अत्याचाराच्या (Women attrocity) प्रकरणाला वेगळेच वळण लागू पाहत असून, पोलिसांच्या (Police) नावाने दोघांनी तिच्या माता-पित्याशी संपर्क केला असून, एका कोऱ्या कागदावर सह्या करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Nilam Gorhe) यांना मिळाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. (Unidentified police meet victim`s relatives & Sarpanch)

Dr. Nilamtai Gorhe
Eknath Khadse: रस्त्याची कामे न करताच कोट्यवधींचा गैरव्यवहार?

दरम्यान याबाबत उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी नाशिक विभागाच्या डीआयजींशी संपर्क करीत लक्ष घालण्याची मागणी केली. या प्रकाराचा निषेध करीत योग्य दिशेने तपास व्हावा आणि पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Dr. Nilamtai Gorhe
NCP: युवतीवर अत्याचार होऊनही महाराष्ट्रातील `इडी` सरकार संवेदनाहीन!

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (ता. १७) सायंकाळी पाचच्या सुमाराला स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांचा डॉ. गोऱ्हे यांना फोन आला. त्यात त्या पीडित मुलीचे वडील आणि सरपंचांना दोन अज्ञात व्यक्ती आले. पोलिसांनी ‘तुम्ही सही करून द्या’, असं सांगितल्याचे ते म्हणाले. या कागदावर ‘माध्यम प्रतिनिधींना आमची विनंती आहे, की आमच्या मुलीची बदनामी होत असल्यामुळे तुम्ही या प्रकरणाला कुठली प्रसिद्धी देऊ नका.’ डॉ. गोऱ्हे यांनी तातडीने नाशिकच्या पोलिस महानिरीक्षकांशी संपर्क साधला. त्यावर त्यांना अशा प्रकारे पोलिसांना पाठविण्याचा प्रश्नच होत नाही आणि तसे कोणी पोलिस गेलेले नसावे, अशी ग्वाहीही दिली.

डॉ. गोऱ्हे यांनी त्या दोघांनाही याबाबत वकिलांची मदत घ्या आणि त्यांनी सांगितल्याशिवाय कशावरही तुम्ही सही करू नका, असे सांगितले. मात्र आता हे दोन अनोळखी व्यक्ती कोण? ते पोलिसांच्या वेशातही नव्हते, मग कोण, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

या संपूर्ण घटनेवरून संबंधित आरोपींचे लोक त्यात किंवा अजून कोणी समाजकंटक किंवा अन्य कुणी अप्रत्यक्षपणे पोलिसांची व प्रत्यक्ष मदत करू इच्छिणाऱ्या काही शक्ती अशा पद्धतीचा दबाव या कुटुंबीयांवर आणि गावच्या सरपंचांवर आणत असावे, असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे. या घटनेवरून अजूनही वेगवेगळ्या प्रकारे या कुटुंबाला कसा पद्धतीने दबाव त्यांच्यावर आणला जातो आहे, हे स्पष्ट होत आहे. या प्रकरणाच्या वेगळ्या दिशेने होत असलेल्या वाटचालीबद्दल उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com