गुलाबराव पाटलांनी अंधारेंच्या सभेचा धसका का घेतला?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात आहे.
Gulabrao Patil, Sushma Andhare
Gulabrao Patil, Sushma Andharesarkarnama

जळगाव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात आहे. त्यांची मुक्ताईनगर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी सभेला परवानगी नाकारली आहे. त्या विरोधात जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

सभेला परवानगी नाकारण्यामागे शिंदे नेते मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा हात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. गुलाबराव पाटील यांच्या गावात शिवसनेचे (Shivsena) नेते आदित्य ठाकरे यांची सभा झाली होती. त्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्याच पद्धतीने अंधारे यांच्या सभांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच प्रशासनाने सभेला परवानगी नाकारल्याचे सांगितले जात आहे.

Gulabrao Patil, Sushma Andhare
फडणवीसांच्या पंढरपुरातील बैठकीला हजेरी लावलेला राष्ट्रवादीचा मोठा नेता कोण?

आदित्य ठाकरे यांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद आणि आता अंधारेंची यात्रा यशस्वी झाली तर जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील वातावरण आपल्या विरोधात जाईल, अशी भिती शिंदे गटातील आमदारांना आहे, त्यामुळेच आमच्या संभांना परवागी मिळत नाही, असा आरोप ठाकरे गटाच्या वतीने करण्यात येत आहे.

त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी अंधारेंच्या सभांचा धसका घेतला का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा गेल्या चार दिवसापासून जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे. त्यांच्या समवेत शिवसेना ठाकरे गटाचे युवा संघटनेचे विस्तारक शरद कोळी ही आहेत. शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांच्या मतदार संघात सभा घेवून त्यांनी जिल्हा दणाणून टाकला आहे. शरद कोळी यांनी जाहिर सभेत प्रभोक्षक भाषण केले म्हणून त्यांना भाषणबंदी व जिल्हाबंदी करण्यात आली, त्यानंतर अंधारे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली.

Gulabrao Patil, Sushma Andhare
Satara : शिवेंद्रसिंहराजेंना पाहून पालकमंत्र्यांनी फोन कट केला...

या संदर्भात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले होते, मुक्ताईनगरात ठाकरे गटाचे सुषमा अंधारे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. आम्हीही त्या ठिकाणी सभेची परवानगी मागितली होती. मात्र, पोलीसांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी आमची परवानगी नाकारली, तसेच त्यांच्या सभेचीही परवानगी नाकारली आहे. आपण जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने कायदा व सुव्यवस्था पाळणे कर्तव्य असल्याने आम्ही पोलीसांच्या म्हणण्यानुसार सभा रद्द केली आहे. त्यामुळे त्यांचीही सभा होणार नाही असे पाटील यांनी जाहीर केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com