टॉयलेट घोटाळा; मास्टरमाइंड’वर कारवाई कधी?

दीड कोटींच्या टॉयलेट घोटाळ्यात पोलिस ठाण्याकडून पंचायत समितीकडे माहिती मागवण्यात आली
Raver Scam
Raver ScamSarkarnama

रावेर : येथील (Raver) पंचायत समितीतील सुमारे दीड कोटी रुपयांच्या टॉयलेट घोटाळ्यात (Toilet scam) अधिक तपास करण्यासाठी पोलिस (Police) ठाण्याकडून पंचायत समिती कार्यालयाकडे विविध प्रकारची माहिती मागवण्यात आली असून शुक्रवारी जिल्हा परिषदेने गुन्हा दाखल झालेल्या दोघा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी निलंबित केले आहे.

Raver Scam
दीपक पांडेचे उपक्रम नाशिकमध्ये पुढे सुरु राहणार!

येथील पंचायत समितीत दाखल झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी येथील पोलिस ठाण्याने गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांना पत्र लिहून अधिक सविस्तर माहिती मागितली आहे. त्यात पात्र लाभार्थींची मूळ साक्षांकित यादी, २०२०-२१ आणि २१-२२ या आर्थिक वर्षातील स्वच्छ भारत मिशन या योजनेचा ऑडिट रिपोर्ट, स्वच्छ भारत मिशन योजनेचे विविध शासन निर्णय आणि मार्गदर्शक सूचना, विविध गावातील ग्रामपंचायती आणि सरपंचांकडून आलेली लाभार्थ्यांची यादी, या विभागातील कंत्राटी कर्मचारी समाधान निंभोरे आणि मंजुश्री पवार यांनी अर्थ विभागाकडे सादर केलेले विविध प्रस्ताव, दोघे कंत्राटी कर्मचारी कोणाच्या नियंत्रणाखाली काम करत होते याबाबतची सविस्तर माहिती आणि २०२०-२२ या कार्यकाळात पंचायत समितीतील अर्थ विभागात कोणकोणते अधिकारी आणि कर्मचारी काम करत होते आदी माहिती मागविण्यात आली आहे.

Raver Scam
नितीन गडकरींची घोषणा; धुळे, नंदुरबारला १२ हजार कोटींचे रस्ते

याबाबत श्रीमती कोतवाल यांनी सांगितले, की यातील सर्वच माहिती पंचायत समितीकडे उपलब्ध असून केवळ ऑडिट रिपोर्ट हा जिल्हा परिषदेकडून आल्यावर सर्व माहिती पोलिस ठाण्यात देण्यात येईल. दोघा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सादर केलेले प्रस्ताव हे त्यांच्या कक्षात पंचनामा करून सोमवारी तपासण्यात येतील आणि उपलब्ध असल्यास ते पोलिस ठाण्यात उपलब्ध करून देण्यात येतील, असेही श्रीमती कोतवाल यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी निलंबन

या संदर्भात गुन्हा दाखल झालेले समाधान निंभोरे आणि मंजुश्री पवार या दोघ कंत्राटी कर्मचाऱ्यांना आपल्या कामावरून कायमस्वरूपी काढून टाकण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काढले आहेत. याबाबतचे पत्र शुक्रवारी पंचायत समितीला प्राप्त झाले आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com