‘पीएफआय’च्या संशयितांचा मोबाईल डेटा फॉर्मेट करणारा गजाआड

नाशिक एटीएसकडून जळगावातून संशयिताला घेतले ताब्यात
PFI Suspect produced in Court
PFI Suspect produced in CourtSarkarnama

नाशिक : देशविघातक (Anti national activities) कारवाया आणि सामाजिक अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली जेरबंद केलेल्या ‘पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया’ (PFI) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या (Organisation) संशयितांच्या मोबाईल, लॅपटॉपमधील संवेदनशिल डेटा फॉरमॅट करून देणाऱ्या संशयितास (Accuse) नाशिकच्या (Nashik) दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केली. (Police arrests PFI`s IT expert from Nashik)

PFI Suspect produced in Court
दहा ट्रक कागदपत्रे घेऊन जा, पण अगोदर गुन्हा नोंद करा!

उनैस उमर खय्याम पटेल (३२, रा.जळगाव) या संशयितास शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयाने ४ नोव्हेंबरपर्यंत १४ दिवसांची एटीएस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, संशयित पटेल याचे काही आक्षेपार्ह संवादाचे ऑडिओ क्लिपही एटीएसच्या हाती लागल्या असून त्याचीही सखोल चौकशी एटीएसतर्फे करण्यात येणार आहे. एटीएसने गेल्या महिन्यात मालेगावातील एकासह पाच संशयितांना अटक केली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

PFI Suspect produced in Court
`पदविधर` निवडणुकीत विखे- थोरातांची पारंपारीक लढत?

गेल्या महिन्यात २२ सप्टेंबर रोजी पहाटे राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नेतृत्वाखाली राज्यात दहशतवादविरोधी पथकाच्या नाशिक पथकाने मालेगावसह पुणे, बीड आणि कोल्हापूरातून पाच संशयितांना अटक केली आहे. या पाचही संशयितांच्या २६ दिवस एटीएस कोठडीतील चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. एटीएसने पाचही संशयिताचे मोबाईल, त्यांच्याकडील लॅपटॉप व अन्य साहित्य जप्त केले आहे. मोबाईल आणि लॅपटॉपमधील माहितीचा तांत्रिकदृष्ट्या तपास करीत असताना, त्यातील बहुतांशी संवेदनशिल डेटा फॉरमॅट करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यादृष्टीने एटीएसने तपास सुरू केला असता जळगावातीलच संशयित तरुण पटेल याच्याकडून सदरील डेटा फॉरमॅट करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या संदर्भात एटीएसने पटेल याची गेल्या काही दिवसात तीन-चार वेळा चौकशीसाठी बोलाविले होते. त्यानुसार पटेल हजरही झाला. मात्र गेल्या शुक्रवारी (ता.२१) रात्री उशिरा एटीएसने त्यास अटक केली. त्याने कोणत्या तंत्रज्ञानाच्या आधारे संशयितांच्या मोबाईल व लॅपटॉपमधील डेटा फॉरमॅट केला, याचा तपास करण्यासाठी एटीएसने न्यायालयाकडे १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. या संदर्भात सरकारी पक्षातर्फे विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर तर बचाव पक्षातर्फे ॲड. ए.ए. अन्सारी यांनी युक्तिवाद केला.

पटेल संशयितांच्या संपर्कात

डेटा फॉरमॅटप्रकरणी अटक केलेल्या उनैस पटेल याचे यापूर्वी अटक केलेल्या पीएफआयचा संशयित वसीम शेख याच्या संपर्कात आला होता. त्याचा मोबाईल डेटा पटेलने फॉरमॅट करून दिला होता. त्यानंतर, पटेलने कय्यूम शेखचाही मोबाईल फॉरमॅट करून दिल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. तसेच, या संशयितांचा क्रिएटिव्ह माईड्स ग्रुप नावाचा व्हॉट्सअप ग्रुपही असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पटेलच्या मोबाइलमधील दोन ऑडिओ क्लीप एटीएसच्या हाती लागल्या आहेत. यातील संभाषण आक्षेपार्ह असल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला आहे. संशयित पटेल याने संशयितांचा मोबाईल फॉरमॅट कसा केला, त्यात कोणता डेटा होता, ही माहिती मिळविण्यासाठी न्यायालयाने एटीएसच्या मागणीनुसार १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

याआधी अटक केलेले पाच संशयित

नाशिकच्या एटीएस पथकाने मालेगावातून संशयित मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी (२६, रा. हुडको कॉलनी, मालेगाव), पुण्यातून अब्दुल कय्यूम बादुल्ला शेख (४८), रझी अहमद खान (३१, रा. दोन्ही रा. कोंढवा, पुणे), वसीम अझीम ऊर्फ मुन्ना शेख (२९, रा. अजीजपुरा, बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. सुभाषनगर, कोल्हापूर) या पाच सदस्यांना अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in