मशिदीसमोर घोषणा देणाऱ्या मनसे नेत्यांना अटक!

शहरात मनसेच्या २९ कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत.
Sujata Dere News, Nashik MNS leader news, Loudspeaker controversy News in Marathi, Nashik MNS News
Sujata Dere News, Nashik MNS leader news, Loudspeaker controversy News in Marathi, Nashik MNS NewsSarkarnama

नाशिक : अजान विरोधात नाशिकमध्ये (Nashik) आज पहाटे आंदोलन झाले. पहाटे अजान सुरू होताच मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी विरोध केला. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी (Police arrest MNS activists) ताब्यात घेतले. यावेळी माजी नगरसेविका सुजाता डेरे (Suajata Dere) यांना अटक करण्यात आली. शहरातील २९ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. (Loudspeaker controversy News in Marathi)

Sujata Dere News, Nashik MNS leader news, Loudspeaker controversy News in Marathi, Nashik MNS News
नवनीत राणांना जे. जे. रुग्णालयात हलवलं! आजच जामिनाचा निकाल लागणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मशिदींवरील भोग्याच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याचे फडसाद अपेक्षीत होते. पहाटेच्या सुमारास दूध बाजार येथील मशिदीमध्ये अजान सुरू होताच मनसे कार्यकर्ते आणि माजी नगरसेविका सुजाता डेरे यांनी श्रीरामाच्या घोषणा देत विरोध केला. हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने सुजाता डेरे आणि त्यांच्यासमवेत असलेल्या इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Sujata Dere News, Nashik MNS leader news, Loudspeaker controversy News in Marathi, Nashik MNS News
महापालिका निवडणुका कधी? मुश्रीफांनी सांगितला मुहुर्त

जुने नाशिक परिसरात छप्परीची तालीम येथील मंदिरात अज्ञात व्यक्तीने समोरच्या मशिदीमध्ये सुरू असलेल्या मशिदीत आजान सुरु होताच भोंग्यावर हनुमान चालीसा सुरु केली. पोलिसांनी येथील भोगा जप्त केला. याठिकाणी अज्ञात व्यक्तींनी हा भोंगा सुरू केला होता. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

आज पहाटे दोनपासून शहरातील विविध भागांमध्ये पोलिसांनी गस्त सुरू केली आहे. अतिशय कडक पोलिस बंदोबस्त असताना देखील या घटना घडल्या. सातपूर परिसरामध्ये पोलिसांकडून काही भोगे देखील जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

शहरातील संवेदनशील मशिदीबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे. सकाळपासून शहरातील मनसे एकोणतीस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यापैकी काही जणांना तडीपारीच्या नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com