मालेगाव दंगल; `राष्ट्रवादी`चे नगरसेवक अय्याज हलचल अटक, जनता दलाचे मुश्तकीन डिग्नीटींचा शोध

त्रिपुरा येथील प्रार्थनास्थळाच्या वादावरून गेल्या शुक्रवारी मालेगाव येथे दंगल झाली होती.
Malegaon, Aiyaj Halchal
Malegaon, Aiyaj HalchalSarkarnama

मालेगाव : त्रिपुरातील घटनेचे पडसाद म्हणून गेल्या शुक्रवारी जमलेला जमाव, दगडफेक व दंगलीच्या तपासात पोलिसांनी याबाबत पाच गुन्हे दाखल केले होते. यासंदर्भात पोलिसांनी वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल करणारे नगरसेवक अय्याज अहमद मोहंमद सुलतान उर्फ अय्याज हलचल (Aiyaj Halchal, Age 44) याला अटक केली आहे. आतापर्यंत १८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी जनता दलाचे नगरसेवक मुश्तकीन डिग्नीटी यांचा पोलिस शोध घेत आहेत.

Malegaon, Aiyaj Halchal
...आणि बाबासाहेब पुरंदरेंची माहिती ऐकून राज ठाकरे भारावले!

दरम्यान अय्याज हलचल हे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी जनता दलाशी झालेल्या महागठबंधनमध्ये प्रवेश केला. सध्या या महागठबंदनचे नेते आमदार मौलाना मुफ्ती `एसआयएम`पक्षात असून त्यांच्या नेतृत्वाखाली अय्याज काम करतो. या प्रकरणी जनता दलाचे नेते व महापालिकेतील महागठबंदनचे महत्त्वाचे नेते, नगरसेवक मुश्तकीन डिग्सेनीटी यांचा पोलिस शोध घेत आहेत. ते (कै) निहाल अहमद यांचे जावई आहेत.

Malegaon, Aiyaj Halchal
आम्ही आदिवासी, शरद पवार हे आमचे सेनापती!

व्हायरल झालेला व्हिडीओ आणि `कुत्ता गोली`ची नशा करणारे टवाळखोर जबाबदार असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले. त्यामुळे पोलिसांनी अतिशय कठोर पावले उचचली आहेत. काही समाजकंटकांनी अल्पवयीन मुलांना प्रोत्साहन देऊन दगडफेक केल्याचे निदर्शनास आले.

याबाबत अटक केलेल्यांमध्ये दोन सराईत गुन्हेगार आहेत. आगामी काळात विना प्रिस्क्रीपशन अल्प्राझोलम (कुत्ता गोळी) विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. अय्याज अहमद मोहंमद सुलतान उर्फ अय्याज हलचल (वय ४४) व त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध पोलिस शिपाई नितेश खैरनार यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक केल्याने दंगलीच्या मुळाशी जाण्यास पोलिसांनी मदत होईल.

याबाबत माजी आमदार आसिफ शेख यांनी शहरातील हिंसक घटनांची सर्वंकष चौकशी करावी, अशी मागणी केली. ते म्हणाले, दिवसभर शांततापूर्ण बंद असताना दोन धर्मात अराजकता निर्माण करण्यासाठी काहींनी हा प्रयत्न केला तर नाही ना, याबाबतही चौकशी व्हावी. आगामी महापालिका व काही राज्यातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील वातावरण दुषीत करण्याचा हा प्रयत्न तर नव्हता ना, याकडे लक्ष द्यावे. सहारा हॉस्पिटल व शिवाजी पुतळ्यापुढील जुन्या महामार्गावर हिंसाचार करणाऱ्यांमध्ये कोण-कोण होते, त्याची सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून शहानिशा करावी. दोषींवर कारवाई करताना निर्दोष लोकांवर कारवाई झाल्यास विरोध करु.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com