Nashik Breaking; शिवसेनेने इशारा देताच ४ हल्लेखोर पोलिसांकडून अटक

शिवसेना नेते कोकणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे मुख्यमंत्री शिंदे गटाचे असल्याची चर्चा.
Jayant Naiknavare
Jayant Naiknavare Sarkarnama

नाशिक : शिवसेना (Shivsena) नेते बाळा कोकणे (Bala Kokane) यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला होता. यातील आरोपींचा आठवडाभर पत्ता नव्हता. पोलिस (Police) काहीच बोलत नव्हते. मात्र काल शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दौऱ्याच्या दिवशीच मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर चोविस तासांत चार हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली. हे हल्लेखोर एकनाथ शिंदे गटाचे असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. (This incident is link with Shivsena rebel Eknath Shinde`s poster attacked)

Jayant Naiknavare
Nashik News, बनकर, कोकाटे यांना लॅाटरी लागली, मात्र घरचे आव्हान पेलवणार का?

दरम्यान याबाबत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत मनोज पाटील, पंकज सोनवणे, सूरज राजपूत आणि सागर दिघोळे यांनी अटक केल्याची माहिती दिली. हे सर्व सराईत गुन्हेगार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Jayant Naiknavare
सत्ता येताच आमदाराचे सुडाचे राजकारण; एसपींची तडकाफडकी बदली !

शिवसेनेचे मध्य विधानसभा मतदारसंघ प्रमुख बाळा कोकणे यांच्यावर गेल्या आठवड्यात पाच जणांच्या टोळीने धारधार सशस्त्र हल्ला केला होता. यातील सर्व हल्लेखोर पसार झाले होते. मात्र पोलिस या प्रकरणाच्या तपासात दिरंगाई करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. वारंवार मागणी करूनही कारवाई होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मालेगाव दौऱ्याच्या दिवशीच शिवसेनेने या विषयी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते.

कोकणे यांच्या हल्लेखोरांना अटक न केल्यास शिवसेना मोठा मोर्चा काढणार असल्याने पोलिसांची यंत्रणा अचानक सक्रीय झाली. आज दुपारी कार्यकर्त्यावर हल्ला करणारे चार जण पोलिसांनी गडकरी चौकातून अटक केल्याचा संदेश व्हायरल झाला होता. मात्र भद्रकाली पोलिसांनी याबाबत काहीही माहिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर या प्रकरणातील चौघे जण स्वतःहून भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती बाहेर आली.

विशेष म्हणजे आज सकाळीच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने या प्रकरणातील संशयीतांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. हल्ला करणारे मुख्यमंत्री शिंदे गटाचे असल्याचा आरोप यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. संशयित आरोपी निष्पन्न असूनही पोलिस कारवाई करत नव्हती, असा आरोप यावेळी त्यांनी केला. शिंदे गटातील लोकांनी सुपारी देऊन हा हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com