धक्कादायक; अवैध धंद्यांत ‘पोलिसांची’ पार्टनरशीप?

जळगाव शहरात मटक्याच्या अड्ड्यांसाठी परवानगी देणारे पोलिस राहतात नामानिराळे.
Police logo
Police logoSarkarnama

जळगाव : शहरातील (Jalgaon) सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीत (Police) काही प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. मात्र शहर- जिल्‍हापेठ या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीच्या सीमेवर अवैध धंद्यासाठी चुरशीची स्पर्धा आहे. अवैध धंदेवाईक त्याचा योग्यरीत्या फायदा करून घेत असून त्यात चक्क पोलिसांचीच भागीदारी असल्याची धक्कादायक प्रकार सुरु असल्याची चर्चा आहे. (Jalgaon city police giving backing to illegal activities)

Police logo
कामाख्या देवी पावली?,१२ माजी नगरसेवक शिंदे गटात

जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील जिल्‍हापेठ आणि शहर पोलिसांत हद्द विभागणी झाली आहे. उर्वरित भाग एमआयडीसी, रामानंद, तालुका पोलिसांत विभागला जातो. मात्र शहरातील काही अवैध व्यावसायांत चक्क पोलिसच भागीदार असल्याची उघड चर्चा आहे.

Police logo
शरद कोळींचे गुलाबराव पाटील यांना थेट आव्हान

शाहूनगरला स्वातंत्र्य सेनानी मीरशुक्रूल्ला उद्यानाच्या जागेत सट्टा-जुगारासह सर्वच अवैध धंद्यांना ऊत आला आहे. जिल्‍हापेठ- शहर पोलिस ठाण्याच्या सामाईक हद्दीत शाहूनगर दोन विभागांत विभागले जाते. शहर पोलिसांनी मच्छी मार्केटमध्ये सट्ट्याला परवानगी दिली, की जिल्‍हापेठ ‘ट्रॅफिक गार्डन’मध्ये परवानगी देते. पडकी शाळेत जुगाराचा डाव बसला, की उद्यानात जुगाराचा डाव बसविला जातो. जळकी मिलमध्ये सट्टा चालविला, की जिल्‍हापेठ हद्दीत पिंप्राळा रेल्वेगेटजवळ धंदा सुरू होतो. पानटपरीवर गांजा विक्रीची परवानगी मिळाली की गांजा विक्रेत्याला जिल्हापेठ हद्दीत आणले जाते, अशी स्पर्धा सध्या सुरू आहे.

पोलिसांच्या हिंमतला ‘किंमत’

जिल्‍हा पेठ-शहर व गुन्हेशाखेच्या पोलिसांनी मर्यादेच्या सर्व हद्द ओलांडून सट्टापेढीसह अवैध धंद्यांना परवानगी दिली अन्‌ आपल्या हिंमतीचे दर्शन घडवून आणले. बातमी प्रसिद्ध झाल्यावर त्या गुन्हेगारांना सांगून हल्ला घडवून आणण्यातही ‘पोलिस दादा’ मागे-पुढे पाहणार नाहीत. इथवर त्यांची मजल गेली आहे. तिन्ही बाजूंना ‘पोलिस लाइन’ असताना, उघड्यावर धंद्याची परवानगी देणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची तसदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

६०-४० पार्टनरशीप

सट्टा-जुगार अड्डा असो की वाळू, गुटखा- गांजा असो, पूर्वीचे पोलिस केवळ हप्ते घेत. आता मात्र ६०-४० च्या पार्टनरशीपची नवीन पद्धत रूढ झाली आहे. ‘कलेक्शन वाला’ पोलिस एका स्पॉटचे लाख-दीड लाखाचा ‘सेक्शन’ ठरवून घेतो. ज्यांना परवडते, त्यांच्याकडे नियमित हप्ते सुरू होतात. मात्र, काही ठिकाणी ६०-४० किंवा ५०- ५० ची पार्टनरशीपची डील झाल्याचेही एका सट्टापेढीवाल्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

बीजे मार्केटमध्ये भरला बाजार

‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर आरटीआय कार्यकर्त्यांनी सहज बी. जे. मार्केटमध्ये फेरफटका मारला. त्या ठिकाणी गुडगुडी, सट्टा आणि सोरटच्या धंद्यावर सटोड्यांचा बाजार भरल्याचे दिसून आले. सुदैवाने हा परिसरही जिल्‍हापेठ पोलिसांच्याच बॉर्डर हद्द असलेल्या परिसरातच आहे. त्याचे चित्रण दीपक गुप्ता यांनी जिल्‍हा पोलिस अधीक्षकांना पाठविल्यानंतर त्यांनी प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, परवानगी देणारे पोलिस दादा नामानिराळेच असून, अधिकारी बदल झाल्यावर उलट त्यांना सेक्शन वाढून पैसा उकळता येतो.

नो-चिंता डायलॉग व्हायरल

बीजे मार्केटमध्ये भरलेल्या बाजारात एका अवैध धंद्यावर चौकशी केल्यावर आता सर्व धंदे सुरू झाले आहेत. चिंथा साहेब होते, तोपर्यंत कळ सोसली. आता मात्र, नो-चिंता.. छापा पडण्याअगोदरच कलेक्शनचे कर्मचारी टीप देतात. नाही तर साहेबांसह कारवाईला धावून येतात, असा बिनधास्त संवाद चित्रित झाला असून, तो सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com