ACB Nashik News : उपनिबंधक खरेंच्या मालमत्ता पाहून पोलिसही अचंबित !

खरे यांच्या बँक खात्यात आढळली ४३ लाखांची माया तर चावी सापडत नसल्याने आज तोडणार लॉकर
Satish Khare
Satish KhareSarkarnama

ACB Nashik News : लाच प्रकरणात अटकेत असलेल्या जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या विविध बँक खात्यांतून ४३ लाखांची रक्कम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केली आहे. दरम्यान, बँकेतील लॉकरची चावी सापडत नसल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे आज कायदेशीर प्रक्रियेनंतर हे लॉकर्स तोडणार असून, त्यातूनही मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे. (Police will break bank locker of satish khare today)

दरम्यान नाशिकचा (Nashik) लाचलुचपत विभाग (ACB) गेले तीन दिवस खरे यांच्या मालमत्तांचा तपास करीत आहे. घरातील रोकड, सोने, बँक खात्यातील लाखो रुपये आणि जमीन जुमला लक्षात आल्यावर पोलिस (Police) देखील चक्रावले आहेत.

Satish Khare
Jalgaon Crime News : आला...रे आला मन्या आला अन्‌ माफी मागुन गेला

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासी पथकाने खरे यांचे विविध बँकांतील आठ खाते सीज केले होते. त्यामधील सुमारे ४३ लाख रुपयांची माया पथकाने जप्त केली आहे. तर जनलक्ष्मी सहकारी बँकेसह आणखी दोन बँकांमध्ये त्यांचे लॉकर्स आहेत. लॉकर्सच्या चाव्या तपासी पथकाच्या हाती लागलेल्या नाहीत. याबाबत चौकशी केली असता, खरे व त्यांच्या कुटुंबियांनीही चाव्या नसल्याचे तपासी पथकाला सांगितले. त्यामुळे पथकाने बँकेकडे कायदेशीर प्रक्रिया करीत लॉकर्स तोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अखेर सतीश खरे निलंबीत

लाच स्विकारल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्याच्या सहकार विभागाने जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना निलंबीत केले आहे. तत्पूर्वी विभागीय सहनिबंधक कार्यालयाने त्यांचा पदभार तत्काळ काढून घेतलेला आहे. या प्रकरणी बुधवारी (ता. १७) सहकार विभागाकडून निलंबनाचे आदेश प्राप्त झाले असून, पूर्वपरवानगी शिवाय खरे यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत.

Satish Khare
Maharashtra BJP : महाराष्ट्र भाजप आव्हानं कशी पेलणार ?

सोमवारी रात्री उशीरा खरे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ३० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यानुसार गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली. मंगळवारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तत्पूर्वी विभागीय सहनिंबधक विभागाने खरे यांच्याबाबतचा तोंडी अहवाल सहकार विभागास कळविला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल सादर झाल्यानंतर विभागीय सहनिंबधक कार्यालयाकडून निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर झाला. त्यानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in