Dilip Bankar: पिंपळगाव बसवंतला नगरपरिषद करा

आमदार बनकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र देत केली मागणी.
Dilip Bankar
Dilip BankarSarkarnama

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंतने (Pimpalgaon Baswant) शहराच्या कक्षा ओलांडल्या आहेत. शहरात पायाभूत सुविधांसह विकासाकामांसाठी नगरपरिषद (Municiple Council) अस्तित्वात येणे गरजेचे आहे. शासनाने (Government) तात्काळ पिंपळगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत करावे, अशी मागणी आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (MLA Dilip Bankar meets Cm For Municiple council)

Dilip Bankar
Trible News: आदिवासींची स्वतंत्र जनगणना करावी!

आमदार बनकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की पिंपळगावची लोकसंख्या ५० हजाराच्या पुढे गेली आहे. महसूल विभागाने कृषक, अकृषक विगतवारीत पिंपळगाव शहर निकषात समाविष्ट होते. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ असून शेतीमालाची विक्रमी उलाढाल होते. बॅका, पतसंस्थाचे जाळे विस्तारले आहे. रोजगार उपलब्ध होत असल्याने लोकसंख्या व उपनगर वाढत आहे.

Dilip Bankar
MVP Election: मविप्र संस्थेत बाह्य शक्तींना येऊ देणार नाही!

शहराचा वाढता विस्तार पाहता ग्रामपंचायतीला मुलभूत सुविधांसह विकासकामे साकारणे अवघड होत आहे. पिंपळगाव ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांची मुदत येत्या दोन महिन्यांत संपत आहे. जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ यापूर्वीच संपुष्टात आला आहे. त्यामुळे नगरपरिषद अस्तित्वात आणण्याची ही योग्य वेळ आहे. तरी पिंपळगावला नगरपरिषद दर्जा तात्काळ द्यावा अशी मागणी बनकर यांनी पत्रात केली आहे.

पंधरा वर्षापासूनचा मुद्दा

गेल्या पंधरा वर्षांपासून पिंपळगावला नगरपरिषद अस्तित्वात यावी, ही मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे. २००७ ला तर उद्घोषणाही झाली. पण राजकीय चढाओढीत खिळ बसली. त्यानंतर ओझरला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला. आता शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचा मुद्दा उचलून धरला आहे. आमदार बनकरही आता सकारात्मक असल्याने नगरपरिषद होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in