पिंपळगावकरांनी उपसले निवडणुकीवर बहिष्कारास्त्र!

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा मिळावा यासाठी सहविचार सभा झाली.
MLA. Dilip Bankar
MLA. Dilip BankarSarkarnama

पिंपळगाव बसवंत : शहराचा (Pimpalgaon Baswant) वाढता विस्तार पाहता पायाभूत सुविधा व विकासाला गती देण्यासाठी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत करण्यासाठी आज पिंपळगावकर एकवटले. परस्परांना नेहमीच राजकिय (Politics) शह-काटशह देणारे मुत्सद्दी व युवा नेत्यांनी नगरपरिषदेसाठी एकमेकांच्या सुरात सूर आळविला. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव सहविचार सभेत करण्यात आला. (Pimpalgaon all party villagers came togather for cauncil cause)

MLA. Dilip Bankar
Dr. Nilam Gorhe: भुजबळांच्या भेटीत सरस्वतीबद्दल माहिती जाणून घेईन!

यावेळी नगरपरिषदेसाठी सर्वपक्षीय, गटतटाचे नेते कार्यकर्ते एकत्र आल्याचे चित्र आज दिसले. पिंपळगावला नगरपरिषदेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची हमी आमदार दिलीप बनकर यांनी दिली.

MLA. Dilip Bankar
Dada Bhuse...आणि पालकमंत्री दादा भुसे काहीच करू शकले नाही?

नगरपरिषदेसाठी शगून हॉलमध्ये सहविचार सभा झाली. आमदार दिलीप बनकर, निफाड एज्युकेशनचे उपाध्यक्ष भास्करराव बनकर, सरपंच अलका बनकर, मविप्रचे उपाध्यक्ष विश्‍वासराव मोरे, पिंपळगाव मर्चंट बॅंकेचे ज्येष्ठ संचालक अशोक शाह आदी प्रमुख उपस्थित होते. राजकीय जोडे बाजूला ठेवून नगरपरिषद ही पिंपळगावसाठी काळाची गरज असल्याची भूमिका बापूसाहेब पाटील यांनी मांडली.

सध्या ग्रामपंचायतीचे घर व पाणीपट्टीचे कर हे महानगरपालिकेच्या बरोबरीने आहे. त्यामुळे नगरपरिषद झाली, तरी करवाढ होणार नाही. शहराचा झपाट्याने वाढता विस्तार पाहता रस्ते, गटार आदीसह विकासाची कामे साकारताना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे. लगतच्या नगरपरिषदामध्ये नगरविकास विभागाकडून दुप्पटीने निधी मिळत आहे. राजकीय हेवेदावे दूर ठेऊन नगरपरिषदेसाठी हा एकोपा कायम राखावा.

दीड महिन्यांनी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कुणीही उमेदवारा अर्ज न भरता बहिष्कारांचे अस्त्र वापरण्याची भुमिका मविप्रचे माजी संचालक दिलीप मोरे, सुरेश खोडे, अशोक शाह, गणेश बनकर, दिगंबर लोहिते, राजा गांगुर्डे आदीनी व्यक्त केली. बांधकाम व्यावसायिक रफिक शेख म्हणाले की, नगरपरिषद झाल्यास भव्य इमारती उभ्या राहून एफएसआय वाढवून मुल्यांकनाचे दर कमी असतील. सध्याची स्थिती नगरपरिषदेसाठी सर्वांधिक अनुकूल असल्याचे प्रा. मोरे यांनी सांगितले.

जयंत मुथा यांची नगरपरिषदेसाठीची जनहित याचिका, निवडणुकीत कुणी अर्ज दाखल केला तर उद्भवणारी परिस्थिती यासह विविध प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी अशोक शाह यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय झाला. येत्या दोन आक्टोबरला होणाऱ्या ग्रामसभेत नगरपरिषदेचा ठराव करण्यावर एकमत झाले. हात उंचावून नगरपरिषद झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या.

पंधरा वर्षापूर्वीच मी नगरपरिषदेचा दर्जा शहराला मिळावा यासाठी प्रयत्न करून तशी उद्घोषणा झाली होती. पण त्याला मूर्त स्वरूप आले नाही. आता सर्वाचे एकमत असल्याने नगरपरिषदेसाठी शासनस्तरावर वजन वापरून दर्जा मिळविण्याठी एक पाऊल पुढे असेल.

- दिलीप बनकर, आमदार, निफाड.

--

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com