Pimpalgaon APMC News: बाजार समिती जिंकेल तो आमदार होणार?

Pimpalgaon Bazar Samiti News: बाजार समिती नव्हे विधानसभा; निवडणूक जिंकाल तर आमदार व्हाल!
Dilip Bankar & Anil Kadam
Dilip Bankar & Anil KadamSarkarnama

Dilip Bankar V/s Anil Kadam : तालुक्यात फिराल तर ही बाजार समितीची नव्हे विधानसभेची निवडणूक असावी एव्हढ्या चुरशीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम त्यात उतरले आहेत. गेली २३ वर्षे सत्तेत असलेल्या आमदार बनकर यांचा राजकीय श्वास म्हणजेच बाजार समिती आहे. त्यामुळे येथील आजचा प्रचार म्हणजे काय द्यायचं ते बोला अशी स्थिती असल्याने नेते अक्षरशः खोके उघडून बसल्याचे बोलले जाते. (Niphad taluka`s political power is going through APMC)

पिंपळगाव बसवंत (Niphad) बाजार समितीच्या निवडणूकीत (APMC election) विधानसभेची प्रचिती येत आहे. त्यात प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दिलीप बनकर आणि शिवसेनेचे (Shivsena) आमदार अनिल कदम यांच्यात लढत आहे. त्यात भाजपच्या (BJP) यतीन कदम यांच्या अपक्ष उमेदवारीने ट्वीस्ट आला आहे.

Dilip Bankar & Anil Kadam
Narendra Darade : भुजबळसाहेब, १५ कोटी घेतले, एक रुपया तरी परत केला का?

या निवडणुकीत जस जसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे, चुरस आणि रंगत वाढत जात आहे. त्यामुळे प्रचाराचा धुराळा नव्हे तर थेट मतदार किंवा त्यांचे मध्यस्थ यांच्याशी थेट संपर्क व `काय द्यायचे ते बोला` असे आहे. दोन्ही गटांनी आपल्या हक्काच्या मतदारांचा अज्ञात स्थळी कॅम्प केले आहेत. आता सर्व संघर्ष तटस्थ व कोणत्याच गटात न केलेल्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करणे एव्हढेच पॅनलचे नेते व उमेदवार करीत आहेत.

मतदारांच्या घरी जाऊन उमेदवार विनवणी करतांना दिसतात. निवडणुकीत आमदार दिलीप बनकर यांच्या शेतकरी विकास तर माजी आमदार अनिल कदम यांच्या लोकमान्य परिवर्तन पॅनल मध्ये दिग्गज व नवख्या उमेदवाराचा संगम साधला गेला आहे. त्याने रंगत अजुनच वाढली आहे. त्यात अपक्ष उमेदवार यतीन कदम यांनी ग्रामपंचायत गटात उमेदवारी करून लक्ष वेधले आहे. सोसायटी व ग्रामपंचायत गटातील नात्यागोत्यांचे जाळे घट्ट असलेल्या उमेदवारांचे पारडे जड मानले जात आहे. क्रॉस व्होटींगची शक्यता नाकारता येत नसल्याने फायदा कि धोका यावरून उमेदवारांची धडधड वाढली आहे.

Dilip Bankar & Anil Kadam
Chhagan Bhujbal On Darade : आमदार दराडे यांनी स्वतः उमेदवारी का नाही केली?

विविध मुद्द्यावरून गाजलेली ही निवडणुक आमदार बनकर व माजी आमदार कदम यांच्यासह दिग्गजासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. दोन्ही पॅनलमध्ये तगडे उमेदवार असल्याने जय-पराजयाचे गणित बांधणे अवघड बनले आहे. उमेदवारांनी गत आठ दिवसात रखरखत्या उन्हात मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या. घामाघुम झालेल्या उमेदवाराची चांगलीच दमछाक झाली. प्रचाराच्या आजच्या अखेरच्या दिवशी प्रचार शिगेला पोहचला. मतदारांना आपलेसे करण्यासाठी `तीर्थ-प्रसाद` वाटपात कुठेही कमतरता राहू नये याची दक्षता घेतली जात आहे. लक्ष्मीदर्शन हे हक्काचे साधन दोन्ही पॅनलच्या यंत्रणा राबवित असल्याने काही मतदार तर लाख मोलाचे बनले आहेत.

आमदार दिलीप बनकर यांची या बाजार समितीवर बावीस वर्षे सत्ता आहे. या सत्तेच्या बळावरच अनेक संस्था व राजकीय शक्तीस्थळे काबीज करण्यात ते यशस्वी झाले आहेत. ग्रामपंचायत, बँक, साखर कारखाना, ग्रामपंचायती, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या आणि अंतिमतः विधानसभेचा मार्ग म्हणजेच बाजार समिती. या सर्व सत्तास्थांनाचा जीव बाजार समितीच्या पोपटात आहे. हा पोपट आपल्या काह्यात राहील यासाठी पॅनेलच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आमदार बनकर यांना राजकारण जोमात ठेवायचे तर बाजार समिती ताब्यात ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

Dilip Bankar & Anil Kadam
Malegaon APMC : दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे गटात पेटले सुडाचे राजकारण!

माजी आमदार कदम यांनी या निवडणुकीत `मविप्र`, सहकार, राजकीय पक्ष, गट, नातेसंबध, मैत्री यांची सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. प्रस्थापित असल्याने बनकर यांना काही उमेदवार निवडताना मर्यादा आल्याचे दिसते. त्यामुळे क्रॉस व्होटींग निश्चित आहे. प्रस्थापित व विरोधक दोघांनाही त्याचा दगा फटका होऊ शकतो. माजी आमदार अनिल कदम यांनी दिग्गज नेत्यांची मोट बांधुन तगडे आव्हान उभे केले आहे. कदम यांच्या उमेदवारीने ग्रामपंचायत गटात दे धक्का निकाल लागण्याची चर्चा आहे. एकंदर ही निवडणूक म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार बनकर यांची प्रतिष्ठा तर शिवसेनेचे माजी आमदार कदम यांच्यासाठी अस्तित्वाची बनली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com