`पीएफआय`चा सातवा सदस्य, मौलानास मालेगावातून अटक

`पीएफआय`चा सक्रिय सदस्य, सोशल मीडियावर चिथावणीखोर संदेश
Maulana Irfan with Police
Maulana Irfan with PoliceSarkarnama

नाशिक : देशविघातक (Anti national activities) कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) (PFI) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या सातव्या संशयिताला नाशिक (Nashik) दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) (ATS) मालेगावातून (Malegaon) अटक केली. मालेगाव येथील जामा मशिदीच्या मौलाना इरफान दौलत खान नदवी (वय ३५, रा. गुलशेरनगर, मालेगाव) (Maulana Irfan Daulat khan) यास एटीएसने रविवारी (ता. १३) अटक केली. (ATS arrest Maulana Irfan Nadvi from Malegaon for anti national activities)

Maulana Irfan with Police
एकनाथ खडसेंनी दूध संघात निवडून येऊन दाखवावे

मौलाना इरफान नदवी यास नाशिक येथील विशेष न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. काही आठवड्यांपासून मौलाना नदवी याच्या हालचालीवर एटीएसची नजर होती.

Maulana Irfan with Police
तरुणीच्या दुचाकीत सापडला चक्क गावठी कट्टा!

दरम्यान, पीएफआयशी संबंधित मालेगावातून अटक करण्यात आलेला हा दुसरा संशयित आहे. २२ सप्टेंबरला पीएफआयचा जिल्हाध्यक्ष मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी (वय २६, मालेगाव, जि. नाशिक) यास एटीएसने अटक केलेली आहे.

मौलाना इरफान दौलत खान नदवी (वय ३५, रा. गुलशेरनगर, मालेगाव) यास नाशिक एटीएसच्या पथकाने रविवारी (ता. १३) अटक केली. मौलान नदवी हा पीएफआयचा २०१९ पासून सक्रिय सदस्य आहे. या संघटनेचा तो माजी जिल्हाध्यक्ष असून, सध्या या संघटनेचा मालेगाव समन्वयक आहे. २०२१ पासून तो ऑल इंडिया इमाम कौन्सिल या संघटनेचा राज्य अध्यक्षही आहे. मौलाना नदवी याच्या प्राथमिक चौकशीदरम्यान त्याने अनेक बाबी दडविल्याने एटीएसने त्यास अटक केल्याचे सरकारी पक्षातर्फे विशेष न्यायालयात सांगण्यात आले.

टेरर फंडिंगशी संबंध

देशविघातक कारवाया, टेरर फंडिंग केल्याच्या संशयावरून एटीएसने अटक केलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) प्रमुख कार्यकर्ता मोहंमद इरफान दौलत खान ऊर्फ मौलाना इरफान खान नदवी याची एटीएसने आधी संशयावरून चौकशी केली होती. चौकशीनंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले होते. या काळात त्याने पत्रकार परिषद घेत संघटनेवरील बंदीचा विरोध केला होता.

संघटनेच्या अन्य काही कार्यकर्त्यांना शहरासह जिल्ह्यातून अटक झाल्यानंतर संशयितांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार टेरर फंडिंग प्रकरणात मौलाना इरफानचा नजीकचा संबंध असल्याचे समजते. मौलाना इरफान त्याचे आप्तस्वकीय व मित्रांच्या खात्यावर काही निधी आल्याचे समजते.

या निधीचा देशविरोधी कारवायांसाठी दुरुपयोग करण्यात येत होता. मौलाना इरफानच्या अटकेनंतर सोमवारी रात्री दहशतवादविरोधी पथकाने त्याच्या घराची झडती घेतली. झडतीत महत्त्वाची कागदपत्रे, प्रचार साहित्य व आर्थिक व्यवहारासंदर्भातील माहिती असलेले दस्ताऐवज जप्त केल्याचे समजते. पीएफआयशी संबंधित येथील हुडको कॉलनी भागातील पीएफआयचा प्रमुख मौलाना सैफुर रहेमान अन्सारी हा यापूर्वीच अटकेत आहे. सैफुर रहेमानच्या अटकेनंतर तातडीने मौलाना इरफान खानला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in