NIA: ‘पीएफआय’संघटनेचे देशभरातील बँकांत तीन लाख अकाउंट

मालेगावी येथे `एनआयए`च्या छापेमारीमध्ये ‘पीएफआय’चा मौलाना सैफूर रहेमान ताब्यात.
Maulana saifur Rehman
Maulana saifur RehmanSarkarnama

मालेगाव : शहरासह (Malegaon) राज्यात ‘पीएफआय’ (PFI) संघटनेच्या कारवाया तसेच उपक्रम संशयास्पद असल्याने गुरुवारी पहाटे राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व एटीएसने (ATS) छापेमारी केली. यामध्ये `पीएफआय` संघटनेचा प्रमुख मौलाना सैफूर रहेमान अन्सारी (Maulana maifur rehman Ansari) याला ताब्यात घेतले. (NIA take action regarding terror funding inconnection with Popular Front of India)

Maulana saifur Rehman
आमदार सांगतात, `कुठून अवदसा आठवली, या नादाला लागलो`

मौलाना सैफूर याला ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला येथील अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दुजोरा दिला.

Maulana saifur Rehman
एकनाथ शिंदे अन् त्यांनी फोडलेल्या नगरसेवकांचा फैसला एकाच दिवशी?

राज्यात गुरुवारी पहाटे एनआयएच्या पथकाने अनेक ठिकाणी मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्ते व कार्यालयांवर छापेमारी केली. यात पीएफआयशी संबंधित सैफूर रहेमान अन्सारी याला ताब्यात घेतानाच त्याचे निवासस्थान असलेल्या हुडको कॉलनी, कार्यालयातून काही कागदपत्रे व प्रचारपत्रकारांची तपासणी व चौकशी करण्यात आली. काही संशयास्पद कागदपत्र आणि `सीडी` पथकाने जप्त केल्या.

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेकडून अनेक संशयास्पद घटनांचा धोका असल्याचा इशारा यंत्रणांना गुप्तवार्ता विभागाने दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. या वादग्रस्त संघटनेची देशभरात तीन लाख वैयक्तिक व कौटुंबिक (फॅमिली) अकाउंट आहेत. या खात्यांमध्ये विविध कामांच्या नावाने कतार, कुवैत, बहरीन आणि सौदी अरेबियातून कोट्यवधी रुपये येत असल्याची माहिती आहे. ईडी व अन्य यंत्रणांकडून याबाबत चौकशी केली जात आहे. मौलाना सैफूरला नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com