राहुल गांधीवरील सूडबुद्दीच्या कारवाईला जनता चोख उत्तर देईल

नाशिक जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे वणी येथे मोदी सरकारच्या निषेधार्थ पुतळा दहन करण्यात आला.
Rahul Gandhi News, Nashik Latest Marathi News
Rahul Gandhi News, Nashik Latest Marathi NewsSarkarnama

वणी : काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि उपाध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर केंद्राने ईडीच्या (ED) मदतीने सुडबुद्धीने चौकशी करून बदनामी करीत आहे. गांधी परिवाराने या देशासाठी सर्वोच्च त्याग केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कितीही सुडबुध्दीने खोटी कारवाई केली तरी, जनता त्याला योग्य वेळी उत्तर देईल, असा इशारा युवक काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे. (Youth congress cremate centre government symbolic statue)

Rahul Gandhi News, Nashik Latest Marathi News
राज ठाकरेंना अडवणाऱ्या पहिलवान, साधूंनी आदित्य ठाकरेंचे दिमाखदार स्वागत केले!

जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसने वणी येथे केला. कळवण- सापुतारा त्रिफुलीवरील बिरसा मुंडा चौकात मोदी सरकारच्या पुतळ्याचे दहन करीत निषेध करण्यात आला. (Nashik Latest Marathi News)

Rahul Gandhi News, Nashik Latest Marathi News
खबरदार... कायदा हातात घ्याल तर!

महागाई, बेरोजगारीसारखे महत्त्वाचे प्रश्न देशात असताना या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित व्हावे यासाठी केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचे सहकार्य घेऊन काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत. सामान्यांचे जगणे मुश्किल करणाऱ्या मोदी सरकारने आता प्रत्येक घटनेसाठी काँग्रेसला जबाबदार ठरवण्याची धोरण स्वीकारले आहे.

याचा कळस म्हणजे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना ईडीची नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलून दडपशाही सुरू केली आहे. देशात सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढणा-या पक्षाला केंद्रीय यंत्रणेचा वापर करून त्रास देण्याचे काम मोदी सरकार करत आहे.

या सर्व घटनांच्या निषेधार्थ जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आणि भाजपप्रणित ईडी व केंद्र सरकारच्या विरोधात ग्रामीण जिल्हाध्यक्ष मानस पगार यांच्या नेतृत्वाखील असंख्य आदिवासी बांधवांनी मोदी सरकारच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com