भाजपने पेटविलेल्या वनव्यात देशातील जनता होरपळत आहे.

माजी राज्यमंत्री शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत दोंडाईचा येथे काँग्रेसची जनजागरण पदयात्रा
Dr Shobha Bacchav, Congress leader
Dr Shobha Bacchav, Congress leaderSarkarnama

दोंडाईचा : ठराविक नागरिकांचेच हित जोपासणाऱ्या भाजप सरकारच्या काळात महागाईने कळस गाठला आहे. गरिबांना अधिक गरीब बनविण्याचे काम केंद्र सरकारने केल्याचा आरोप काँग्रेसच्या धुळे जिल्हा प्रभारी तथा माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bacchav) यांनी येथील काँग्रेसच्या जनजागरण अभियानाच्या पार्श्र्वभूमीवर केला.

Dr Shobha Bacchav, Congress leader
नाशिकच्या प्रशासनाने धसका घेतलेला तो `आर्यनमन` आहे तरी कोण?

अभियानाची माहिती देताना त्या म्हणाल्या, की भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान बदलण्याचे काम केले आहे. इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढविले, वाढत्या महागाईने नागरिक होरपळून निघाले आहेत. नागरिक आता भाजपच्या या कारभाराला वैतागले आहेत. केंद्र सरकार शेतकरीविरोधी असून, या सरकारने केलेल्या कायद्यांविरोधात काँग्रेसने वेळोवेळी आंदोलने केली. मात्र ७५० शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर सरकारला हे कायदे रद्द करावे लागले, हे देशाचे दुर्भाग्य आहे.

Dr Shobha Bacchav, Congress leader
अजित पवार यांच्यासमोर तरी आपली एकजूट दिसली पाहिजे

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात जनजागृती अभियान सुरू केले आहे. अभियानात काँग्रेसची सत्ता असताना असलेल्या स्थितीची महिती नागरिकांना दिली जात आहे.

या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव युवराज करनकाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमराज पाटील, किशोर पाटील, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, राजेंद्र देवरे, नरेंद्र पाटील, आबा मुंडे, पांडुरंग माळी, राहुल माणिक, महेंद्र पाटील, शिवा बापू, उमेश भोई, मनोज भोई, प्रवीण पवार, विजेंद्र झालसे, नितीन देसले, विलास गोसावी, वीरेंद्र गोसावी, भय्या माळी, हुसेन बोहरी, राजू देशमुख, कल्लू पठाण, वसंत बापू कोळी, मुन्ना खाटीक, मोना शेख, कैलास आखाडे, भारत जाधव, संभाजी पाटील, मोनुबाबा शेख, संजू माळी, पावभा कोळी, प्रशांत पाटील, रतिलाल पाटील, देवमन पाटील, भोजू गिरासे आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in