मालेगाव मनपाच्या पायरीवर बोकड बळी

नागरी सुविधा समिती शहरातील समस्या आणि नागरिकांच्या प्रश्नावर आक्रमक झाली.
Goat sacrifice agitation
Goat sacrifice agitationSarkarnama

मालेगाव : प्रलंबीत मागण्यांबाबत (Pending Deemands with Malegaon corporation) महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. प्रशासनाचा (Administration) निषेध करत येथील मालेगाव सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने महापालिकेच्या पायरीवर प्रतिकात्मक बोकडाचा बळी (Goat Sacrifice) देत निषेध आंदोलन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे (Ramdas Borase) यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले. (Citizen awareness comittee agitaion in malegaon for Civic issues)

Goat sacrifice agitation
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःचेच आदेश का फिरवतात?

अधिकाऱ्यांना समस्यांबाबत जाणीव होण्यासाठी अशा स्वरुपाचे आंदोलन करण्यात आल्याचे श्री. बोरसे यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्यांचेतातडीने निराकरण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Goat sacrifice agitation
आदेशाला स्थगिती आली, त्यानंतर राष्ट्रवादी जागी झाली!

आंदोलनकर्त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले. आंदोलनाबाबत यापूर्वीच महापालिका अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. मनपाच्या पायरीवर प्रतिकात्मक बोकडाचा बळी देऊन केलेले आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

महापालिकेचे विविध अधिकारी घरी बसून कामकाज करतात. गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांसाठी पाठपुरावा सुरु आहे. मात्र, अधिकारी पुर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. सरदार चौक, शनि चौक या ठिकाणाहून इस्लामाबादकडे जाणारी पाण्याची जलवाहिनी लिकेज आहे. या ठिकाणी धातुरमातुर डागडुजी करुन वेळ मारून नेली. १५ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत जलवाहिनीचे काम करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. मात्र, कार्यवाही करण्यात आली नाही. तीच दुरुस्ती केलेली जलवाहिनी गणेशोत्सवात दुसऱ्या ठिकाणी लिकेज झाली. लिकेज न सापडल्याने चार ते पाच महिने रस्त्यावर पाणी वाहत राहिले. या पाण्यामुळे अनेक लहान- मोठे अपघात झाले. आजमितीस देखील लिकेज तसाच असून, रस्ता नादुरुस्त आहे.

शहरातील जनावरांच्या बेकायदेशीर कतलीचे रक्तमिश्रीत पाणी रोजच मोसम नदीपात्रात वाहते. यातून शहरातील मोक्षगंगेमध्ये जलप्रदूषण होऊन नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्याबाबतही अधिकारी जागरुक नाहीत. शहरात डेंग्यूची साथ सुरु आहे. अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन जाण्यास जागा नाही. जीवघेणे अतिक्रमण काढण्यास महापालिका प्रशासन धजावत नाही. कुसंबा रोडवर तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाला जाग आली.

आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार, देवा पाटील, कैलास शर्मा, मुरलीधर पाटकर, जितेंद्र देसले, शाम गवळी, जगदीश भुसे, क्रांती पाटील, वाहिद भाई, बाबा अहिरे, जयेश गीते, अश्विन पाटील, अखतर भाई, माजिद मन्सुरी, सतीश उपाध्यय, नंदू सोनाग्रा, विशाल पगारे, निलेश पाटील आदी सहभागी झाले होते.

दखल न घेतल्यास आंदोलन

संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे व कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होणे आवश्‍यक आहे. आंबेडकर पुल व रामसेतु पुलावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. शहरात २१ ठिकाणी पार्किंग झोन तयार केले आहेत; मात्र तेही केवळ कागदावरच आहेत. शासन वेळोवेळी मालेगावकरांसाठी करोडोंचा निधी देते. परंतु, विकास आराखड्याप्रमाणे एकही विकास काम होत नाही. त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी प्रतिकात्मक बोकडाचा बळी आंदोलन करण्यात आले. यानंतरही समस्यांची दखल न घेतल्यास आम्ही स्वतःचा बळी देऊ, असा इशारा श्री. बोरसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in