Burning Bus; पेटत्या बसमधून उड्या मारणारी माणसे झेलली!

नाशिकच्या बस अपघाताविषयी प्रत्यक्षदर्शींनी कथन केली घटना.
Crowd at accident place
Crowd at accident placeSarkarnama

नाशिक : कर्णकर्कश (High Sounds) आवाज झाल्यावर घराच्या येऊन बाहेर बघतो तर बस पेटलेल्या (Bus Burned) अवस्थेत होती १४ चाकी डंपर रस्त्याच्या मधोमध आडवा उभा होता तर एक मालवाहू मारुती व्हॅन (Maruti Van) पलटी झालेली होती. अपघातस्थळी (Accident spot) असलेल्या नागरिकांनी अपघात झाल्यानंतरची घटना कथन केली. (People staying near accident spot helps passenger stuck in the bus)

Crowd at accident place
Shivsena: `आता याचा बदला लोकच घेतील`

पावणेपाच वाजता अपघात घडल्यानंतर हार्डवेअरच्या दुकानात काम करणारे अरुण सेंधिया, रामराव सूर्यवंशी याच ठिकाणी राहतात. पहाटे बस- डंपरचा अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला. आवाज झाल्यानंतर येथील लोकांना खडबडून जाग आली. यातील रस्त्या लगतच राहणारे अरुण सेंद्रिय व रामराव सूर्यवंशी यांनी बाहेर येऊन पाहिले तर बसला प्रचंड आग लागलेली होती. औरंगाबाद रोडकडून आलेल्या बसच्या शंभर फूट मागे माणसे जळालेल्या अवस्थेत पडलेली होती. त्यातील दोन माणसे होरपळत होती.

Crowd at accident place
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता किती दिवस टिकेल?

रामराव सूर्यवंशी त्यांचा मुलगा व पत्नी यांनी ट्रकला आग लागलेली असताना यातून बाहेर पडणाऱ्या लोकांना मदत केली. अनेक माणसे बाहेर खिडकीमधून उड्या मारत होती. या लोकांना बसपासून लांब नेण्याचे काम सूर्यवंशी कुटुंबाने केले. यातीलच अरुण सेंधिया याने बसमधून खाली पडलेल्या माणसांच्या कपड्यावरचे आग विझविण्यासाठी त्यांना गवतात नेले. संबंध प्रकारपाहून आसपासचे रहिवासी जमा झाले.

पहाटे साडेचार ते पावणेपाच वाजलेले असताना कर्णकर्कश आवाज ऐकू आला बाहेर येऊन पाहतो तर लक्झरी बसला आग लागली होती. मागे काही माणसे आणि मुले मिळेल त्या खिडकीतून गाडीतून उड्या घेत होती अनेक लोक जळालेल्या अवस्थेतच पेट्रोल पंपाच्या समोर पडले. मात्र हे पाहूनच माझ्या अंगाचे थरका फोडायला लागले मी मिळेल त्याला मदत करू लागलो. मात्र काही वेळाने मला हे पाहून चक्कर आली होती मात्र लोकांना बाहेर काढण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता.

- अरुण सेंधिया, प्रत्यक्षदर्शी

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com