जनता रडकुंडीला... आमदार सुरेश भोळेंच्या मात्र जोर बैठका!

आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेतील बैठकीत कामांचा आढावा घेतला
BJP MLA Suresh Bhole
BJP MLA Suresh BholeSarkarnama

जळगाव : शहरात (Jalgaon) कचरा, (Garbage) अस्वच्छता पसरली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसतात. नागरिक हैरान झाले (People are in problems) असून अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. मात्र स्वच्छतेचे काम करणाऱ्या `वॅाटरग्रेस` कंपनीला (Watergrace) त्याचे सोयरेसुतक नाही. त्यावर ठोस उपाय करण्याऐवजी प्रशासन (Administration) व आमदार सुरेश भोळे (MLA Suresh Bhole) यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आमदारांचा जोर बैठकांवर आहे. (Jalgaon facing problems of garbage and Roads issues)

BJP MLA Suresh Bhole
Shivsena: शिंदे गटाच्या कारकर्त्यांना चोपणाऱ्या रणरागिणींचा शिवसेनेकडून सन्मान

काल यासंदर्भात आमदार भोळे यांच्या उपस्थितीत महापालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी शहरातील दहा रस्त्यांची कामे एकाच वेळी सुरू करा, असे निर्देश आमदार भोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

BJP MLA Suresh Bhole
फडणवीसांच्या दत्तक नाशिकसाठी शिंदे गटाची फिल्डींग!

शहरातील स्वच्छतेचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीकडे आहे, मात्र कंपनीतर्फे कामच केले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत आरोग्याधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली. वॉटरग्रेस कंपनीच्या साफसफाईकडे लक्ष द्यावे, त्यांच्याबाबत नागरिकांकडून कोणतीही तक्रार येऊ नये, तसेच शहरात रस्त्यावर जे कचऱ्याचे ढीग दिसत आहेत त्याची साफसफाई होईल याची काळजी घ्यावी, कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या ताडपत्रीने झाकलेल्या असाव्यात, कंपनी कामे करीत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करा, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील विविध प्रश्नांबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. दहा रस्त्यांच्या कामाबाबत वर्कऑर्डर देऊनही कामे सुरू होत नसल्याच्या तक्रारी आहेत, तर वॉटरग्रेस कंपनीकडे शहरातील स्वच्छतेचा मक्ता असतानाही त्यांच्यामार्फत कामे केली जात नसल्याबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार भोळे यांनी गुरुवारी महापालिकेत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

सतरा मजली इमारतीत तेराव्या मजल्यावर आयुक्तांच्या दालनाशेजारी सभागृहात बैठक झाली. या वेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपायुक्त प्रशांत पाटील, शहर अभियंता मधुकर, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संजय नेमाडे, विद्युत अभियंता एस. एस. पाटील, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रस्तेकामाचा आढावा

आमदार भोळे यांनी प्रारंभी रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. रस्तेकामासाठी आलेल्या ५८ कोटी रुपयांच्या निधीचे समान वाटप सर्व प्रभागांत करून १८ मीटर, १२ मीटर रस्त्याची कामे करावीत, असे निर्देश दिले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com