
Pension holder`s agitation : ईपीएस ९५ पेन्शनर्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष रमेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठक आयटक कार्यालय येथे नुकतीच झाली. २०१४ मध्ये तत्कालीन भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सत्तेत आल्यावर ३ हजार पेन्शन, महागाई भत्त्यासह लागू करू आश्वासन दिले होते. ९ वर्ष उलटून गेले मात्र काहीही निर्णय घेतला नाही. (BJP`s Prakash Jawdekar forget his assurance given before 9 years)
दिल्लीत (News Delhi) अनेक आंदोलन सातत्याने होत आहेत. दखल घेतली जात नाही. याविरुद्ध फेडरेशनतर्फे येत्या रविवारी खासदार कार्यालयांवर थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार शिवसेना (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे.
देशात ७० लाख पेक्षा अधिक पेन्शनर आहेत. यामध्ये ३० लाखावर पेन्शनर्सला १ ते २ हजार रुपयेच मिळतात. जगण्यासाठी ९ हजार रुपये दरमहा पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करण्यासाठी देशभर खासदाराच्या संपर्क कार्यालयावर थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे.
रविवारी सकाळी १० वाजता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या संपर्क कार्यालयावर थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता खासदार हेमंत गोडसे यांच्या संपर्क कार्यालयावर थाळीनाद करण्यात येणार आहे. परिवहन कर्मचारी, औद्योगिक कामगार, साखर कामगार, वीज कामगार, एचएएल, बॉश कामगार, विडी कामगार, सहकारी बँक कर्मचारी, सोसायटी सचिव आदी १६२ आस्थापनातील सेवानिवृत्त कामगार आंदोलनात सहभागी होणार आहे.
या वेळी जिल्हा इपीएस ९५ पेन्शनर्स फेडरेशन संस्थापक अध्यक्ष राजू देसले, जिल्हा सचिव डी. बी. जोशी, कार्याध्यक्ष चेतन पणेर, सुभाष काकड, उपाध्यक्ष प्रकाश नाईक, नामदेव बोराडे, सुभाष शेळके, भगीरथ शिंदे, भाऊसाहेब शिंदे, साहेबराव शिवले, रमेश खापरे, शिवराम रसाळ, शिवाजी ढोबळे, धनंजय चतुर, उत्तम आढाव, नईम शेख, शिवाजी मोगल, पाधे, कृष्णा शिरसाट, अशोक जाधव आदी उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.