कार्यकर्ते म्हणतात, यतीन पगार यांना राष्ट्रवादीतून काढा!

स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी माजी आमदार संजय चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा.
कार्यकर्ते म्हणतात, यतीन पगार यांना राष्ट्रवादीतून काढा!
Sanjay Chavan News, Yatin Pagar News, Nashik NewsSarkarnama

सटाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार यांनी माजी आमदार दीपिका चव्हाण, (Deepika Chavan) संजय चव्हाण (Sanjay Chavan) यांच्यासह पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्‍यांविरुद्ध शिवराळ भाषेचा वापर केला. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्याचा ठराव पक्षाच्या मेळाव्यात करण्यात आला. तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी बैठकीत मांडताच सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हात उंचावून बहुमताने ठराव मंजुर केला. (NCP leaders made resolution to expulsion of Yatin Pagar from Party)

Sanjay Chavan News, Yatin Pagar News, Nashik News
जिल्हा बँक संचालकांच्या सहकारमंत्र्यांची दुसऱ्यांदा स्थगिती

राधाई मंगल कार्यालयात सटाणा शहर व बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी हा ठराव करण्यात आला. (Nashik Latest Marathi News)

Sanjay Chavan News, Yatin Pagar News, Nashik News
महाविकास आघाडी सरकारने रेकार्ड ब्रेक कामे केली!

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणताना बागलाण तालुक्यात पक्षाला गतवैभव प्राप्त करून देणे हेच प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याचे ध्येय असायला पाहिजे. पक्षाला अधिक बळकट करण्याची हीच वेळ असून, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी या मेळाव्यात केले.

श्री. चव्हाण म्हणाले, युवक हे पक्षाची ताकद असून, त्यांना राजकारणात संधी देणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे धोरण आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिकाधिक तरुणांना संधी दिली जाणार आहे. त्यासाठी चावडी बैठका घ्या आणि जनतेसोबत संवाद वाढवा. बुथ पातळीपर्यंत पोहोचा.

तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी वर्धापन दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी बहुसंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, जिभाऊ सोनवणे, ज. ल. पाटील, किरण पाटील, अशोक चव्हाण, चारूदत्त खैरणार, वसंत भामरे, सुनील गवळी, रमेश सूर्यवंशी, किशोरी खैरणार यांची भाषणे झाली.

अध्यक्षस्थानी राज्य महिला आयोगाच्या सदस्या व माजी आमदार दीपिका चव्हाण, पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाठ, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, युवती जिल्हाध्यक्ष किशोरी खैरणार, ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, मविप्र संस्थेचे माजी उपसभापती नानाजी दळवी, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, विजयराज वाघ, केदा भामरे व्यासपीठावर उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in