बागलाणच्या जनतेला मिळाला मनातला आमदार!

सटाणा येथे आमदार दिलीप बोरसे यांचा देवमामलेदार संस्थेने सत्कार केला.
MLA Dilip Borase at Satana
MLA Dilip Borase at SatanaSarkarnama

सटाणा : गेल्या पाच निवडणुकांमध्ये बागलाण (Satana-Nashik) विधानसभा मतदारसंघातील सदस्य जास्तीत जास्त दोन हजार मतांच्या फरकाने निवडून आलेला असताना २०१९ च्या निवडणुकीत आमदार दिलीप बोरसे (Dilip Borse) ३५ हजारच्या मताधिक्याने निवडून आले. बागलाणच्या जनतेला मनातला आमदार मिळाल्याचे मतपेटीतून सिद्ध झाल्याचे प्रतिपादन देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी येथे केले.

MLA Dilip Borase at Satana
जाहीर होण्यापूर्वीच प्रभागरचनेचा आराखडा फुटल्याची चर्चा!

शहरातील पुष्पांजली थिएटर- चित्रा सिनेमा- मळगाव- मुंजवाड रस्त्यासाठी आमदार दिलीप बोरसे यांनी ५ कोटींचा निधी मंजूर करून दिल्याने आमदार दिलीप बोरसे विचार मंचच्या वतीने येथील यशवंतराव महाराज सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री. बागड बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष सुनील मोरे, दगाजी सोनवणे आदी उपस्थित होते.

MLA Dilip Borase at Satana
भूखंड विकासकाला देणार असल्याने शिवसेना-मनसेचा भाजप विरोधात वॉर!

नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आमदार दिलीप बोरसेंचे कौतूक करीत गेल्या पाच वर्षांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी विकासकामांमध्ये दिलेली साथ कायम स्मरणात राहील, असे स्पष्ट करीत आभार मानले.

या वेळी उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, माजी नगरसेवक दिनकर सोनवणे, राकेश खैरनार, भास्कर सोनवणे, प्रकाश सोनवणे, नामपूर बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब भामरे, नाना मोरकर, जे. डी. पवार, सागर आहिरे, रवींद्र खैरनार, काळू मोरे, नरेंद्र कायस्थ, संदीप खैरनार, जीवन सोनवणे, भूषण सूर्यवंशी, शिवाजी सोनवणे, अनिल सोनवणे, स्वप्निल खैरनार आदी उपस्थित होते. प्रवीण पवार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com