शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची नाशिकला जय्यत तयारी

नाशिक येथे अयोध्या दौऱ्यासाठी भगवे झेंडे तयार करण्यात कार्यकर्ते व्यस्त आहेत.
Shivsena workers making flags
Shivsena workers making flagsSarkarnama

नाशिक : युवासेना प्रमुख तथा पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्‍य ठाकरे (Aditya Thakre) येत्‍या १५ जूनला अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याचे संपूर्ण नियोजन नाशिक शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहे. तयारीचा भाग म्‍हणून सध्या भगवे झेंडे सज्‍ज केले जात आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अन्‍य विविध तयारीची लगबगदेखील बघायला मिळत आहे. (Shivsena party workers busy in Aditya Thajrey`s Ayodhya tour)

Shivsena workers making flags
जयंत पाटील म्हणाले, तुमचे प्रश्न सोडविणार!

राजकीय वातावरण पेटलेले असताना यापूर्वीच मंत्री आदित्‍य ठाकरे यांनी अयोध्या दौरा करणार असल्‍याचे जाहीर केलेले आहे. येत्‍या १५ जूनला हा दौरा नियोजित असून, दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी नाशिक शिवसेनेवर सोपविलेली आहे. या अनुषंगाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अहोरात्र मेहनत घेतली जाते आहे. दौऱ्यात फडकविण्यासाठी भगवे झेंडे साकारण्याचे काम कार्यालयात दिवसरात्र सुरू आहे.

Shivsena workers making flags
एकनाथ खडसेंना ६ वर्षांनी गुड न्यूज...विधान परिषदेची उमेदवारी जाहीर!

याशिवाय होर्डिंग्ज उभारणीचे काम अयोध्येतील स्‍थानिक स्‍तरावर देण्यात आलेले आहे. शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्‍यासह अजय बोरस्‍ते, दत्ता गायकवाड, खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे, सुनील बागूल यांच्‍या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांकडून दौऱ्याची तयारी सध्या सुरू आहे.

नाशिकहून विशेष रेल्‍वे

अयोध्या दौऱ्यासाठी नाशिकहून रेल्‍वे व रस्‍ते मार्गाने कार्यकर्ते अयोध्येत दाखल होणार आहे. यासाठी नाशिकहून विशेष रेल्‍वे केलेली असून, यातून सुमारे सोळाशे कार्यकर्ते जातील. काही पदाधिकारी, कार्यकर्ते रस्‍ते मार्गाने अयोध्येत दाखल होणार आहेत.

युवासेना प्रमुख तथा मंत्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्‍साह आहे. प्रत्‍येक पदाधिकारी, कार्यकर्ता नियोजनात योगदान देत असून, सुमारे दोन हजार जण नाशिकहून या दौऱ्यात सहभागी होतील, असे नियोजन आखले आहे.

-सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com