
Parambir Singh News : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना राज्य व केंद्र शासनाने दिलासा दिला आहे. महाविकास आघाडीच्या गृहमंत्र्यांना अडचणीत आणल्याने त्यांना मिळालेले गिफ्ट मानले जात आहे. (Parambir sinh get a special gift from Centre)
केंद्र शासनाने (Centre Government) परमबीर सिंह (Parambir Sinh) यांच्यावरील सर्व आरोप मागे घेत त्यांचे निलंबन रद्द केले. मात्र तरीही ते पुन्हा सेवेत येऊ शकणार नाहीत. त्यांना निलंबन कालावधीचे वेतन व अन्य आर्थीक लाभ मिळतील, मात्र ते गतवर्षीच निवृत्त झाल्याने पुन्हा सेवेत येण्याची शक्यता नाही.
केंद्र शासनाने दोन दिवसांपूर्वी याबाबतचा आदेश काढला. त्यात परसबीर सिंह यांच्यावरील गंभीर स्वरूपाचे आठ आरोप मागे घेण्यात आले आहे. त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले. त्यांचा निलंबण कालावधी सेवा म्हणून गृहीत धरण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.
प्रत्यक्षात परमबीर सिंह हे गतवर्षीच निवृत्त झाले आहे. त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकारने कारावई केल्यावर ते बेपत्ता होते. या कालावधीत ते लंडनला गेल्याच्या बातम्याही आल्या होत्या. त्यामुळे त्यांची कोणतिही चौकशी होऊ शकली नव्हती. त्यामुळे त्यांना केंद्र शासनाने क्लीन चीट दिल्यावर ते पुन्हा सेवेत येणार का अशी चर्चा सुरु झाली होती.
आता परमबीर सिंह यांची खातेनिहाय चौकशी आणि त्यांच्यावर ठेवलेले आठ आरोप राज्य सरकारने मागे घेतले. त्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेतले. दरम्यान, वर्षभरापूर्वीच ते रिटायर झाल्याने ते पुन्हा पोलीस सेवेत येणार नाहीत. मात्र, सेवानिवृत्तीनंतर एखादा आयोग वा तत्सम पदी त्यांची राज्य सरकार नियुक्ती करू शकते. तसेच निलंबन काळातील दीड वर्षाचे त्यांचे वेतन त्यांना मिळणार आहे. याशिवाय त्यांची पीएफ, ग्रॅच्युएटी, पेन्शन मिळण्यातील अडथळाही दूर झाला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.