समृद्धी महामार्ग, शिर्डीनजीक २६ एकर जमीन पुनूमियाची की परमबीर सिंग यांची?

बनावट शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र जोडून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा कथित साथीदार असलेल्या संजय पुनूमिया याने जमीनी खरेदी केल्या.
समृद्धी महामार्ग, शिर्डीनजीक २६ एकर जमीन पुनूमियाची की परमबीर सिंग यांची?
Parambeer singh & land recordSarkarnama

सिन्नर : बनावट शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र जोडून (Bogus certificate of farmer class) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambeer singh) यांचा कथित साथीदार असलेल्या संजय पुनूमिया (Sanjay Punumiya Alleged colleague of parambeer singh) याने धारणगाव व मिरगाव (ता. सिन्नर) येथे शिर्डी महामार्गालगत तब्बल साडेदहा हेक्टर शेतजमीन खरेदी केली आहे. धारणगाव येथील २००७ मधील एका खरेदी प्रकरणात पुनूमियाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. यामुळे राजकीय व हायप्रोफाइल वर्तुळात खळबळ उडाली असून, सिन्नर पोलिसांकडून (Sinner police) या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या ठाणे येथे अटकेत असलेल्या पुनूमियाला येथे आणल्यानंतर या गुन्ह्यातील तीव्रता अधिक स्पष्ट होईल.

Parambeer singh & land record
नाशिकमध्ये भाजपाला धक्का?, "माहिती पत्रका"तून उपमहापौर गायब!

सिन्नर-शिर्डी महामार्गालगत असलेल्या शेतजमिनी खरेदीसाठी एकेकाळी मुंबईतील बड्या राजकीय व्यक्ती, उद्योगपतींसह हायप्रोफाइल व्यक्तींच्या उड्या पडल्या होत्या. त्यामुळे या जमिनींच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. परमबीर सिंग प्रकरणात खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या संजय मिश्रीलाल पुनूमिया यानेही २००७ मध्ये धारणगाव येथील शिर्डी मार्गालगत असलेली शेती गट क्रमांक ३१० मध्ये एक हेक्टर ७८ आर जमिनीची खरेदी केली होती. हे खरेदीखत नोंदविताना त्याने उत्तन (ता. ठाणे) येथील एका शेती गटाचा बनावट सातबारा उतारा सादर केला होता.

Parambeer singh & land record
परमबीर सिंगांच्या नाशिकमध्ये जमिनी?; सिन्नरला नवा गुन्हा दाखल

दीर्घ कालावधीनंतर या जमीन खरेदी प्रकरणाची सुई परमबीरसिंग यांच्याकडे सरकल्यानंतर पुनूमिया याचे शेतकरी असल्याचे ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आल्यानंतर सिन्नर येथील दुय्यम निबंधक प्रमोद वामन यांच्या तक्रारीवरून सिन्नर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परमबीर सिंग यांनी पुनूमिया याच्या नावे बेनामी संपत्ती केल्याची चर्चा असून, त्यादृष्टीने राज्य गुप्तचर यंत्रणा व स्थानिक पोलिस यंत्रणा तपास करीत आहे.

अशा आहेत पुनूमियाच्या जमिनी

सिन्नर तालुक्यात पुनूमिया याच्या नावाने धारणगाव येथील भोकणनाला शेजारच्या शेती गट क्रमांक ३१० मध्ये एक हेक्‍टर ७८ आर क्षेत्र आहे. याच खरेदीसाठी त्याने सादर केलेला शेतकरी असल्याचा सातबारा बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. याच शेतीलगत असलेल्या गट क्रमांक ३११ मध्येही संजय व त्याचा मुलगा सनी पुनूमिया याच्या नावे दोन हेक्टर २६ आर सामाईक क्षेत्र खरेदी करण्यात आले आहे. धारणगाव येथील एकूण शेतजमीन चार हेक्टरच्या आसपास आहे. मिरगाव शिवारातही सायाळे फाट्यावर शिर्डी मार्गाला लागून शेती गट क्रमांक ४७७-१ मधील चार गट उभय पिता-पुत्रांच्या नावाने असल्याचा सातबारा ‘सकाळ’च्या हाती लागला. या ठिकाणी हायवे फ्रंट असलेली सहा हेक्‍टर ३८ आर एवढी जमीन पुनूमिया याच्या नावे आहे. पाथरे येथे गोदावरी कालव्यालगत विहीर खोदण्यासाठी एक गुंठा क्षेत्र खरेदी केल्याची नोंद असून, तेथून पाइपलाइन करून मिरगाव येथे पाणी आणण्यात आले आहे.

...

Related Stories

No stories found.