शिस्तीच्या भाजपाला बेशिस्तपणाचे ग्रहण; मंचावरील गर्दीने "पंकजाताई" भडकल्या!

भाजपच्या सिडको येथील मेळाव्यात कोरोनाची बंधने झुगारून स्टेजवर प्रचंड गर्दी झाली.
Crowd in BJP meeting at Cidco
Crowd in BJP meeting at CidcoSarkarnama

नाशिक : भाजपच्या (BJP) वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बेशिस्तपणाचा कळस झाला. नियोजनाअभावी मंचावर प्रचंड गर्दी झाल्याने स्वतः माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाच माईक हातात घेऊन गर्दी कमी करण्याचे आवाहन करावे लागले. त्याचाही उपयोग न झाल्याने संतापलेल्या पंकजाताई मुंडेंनी (Pankjatai Munde) आयोजक `भाऊ`ला फैलावर घेतल्याने शिस्तबद्ध भाजपच्या कार्यक्रमाचे हसू झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

Crowd in BJP meeting at Cidco
सकाळी भुजबळांचे कौतुक करून दुपारी पंकजा मुंडे सुहास कांदेंना भेटल्या!

शिस्तप्रिय पक्ष असलेल्या भाजपमध्ये काल सिडको येथे झालेल्या मेळाव्यात बेशिस्तपणाच अधिक दिसून आला. यावेळी झालेली गर्दी पाहून कोरोना पळाला की काय? असा प्रश्न उपस्थित झाला. कार्यक्रमाच्या ठिकाणी शासनाचे कोरोनाविषयक सर्व नियम पायदळी तुडवत कार्यकर्ते, पदाधिकारी, महापालिका निवडणुकीतील इच्छुकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे कोण काय बोलते, कोण कोणाला काय सांगते इथपासून तर सगळ्याचाच बोजवारा उडाला. यावेळी सभागृहातील प्रत्येक जन व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे सभागृहात थांबलेले लोक देखील त्याचे अनुकरण करू लागले. त्यामुळे व्यासपीठानर गर्दी व सभागृहात तुरळक गर्दी अशी स्थिती होती.

Crowd in BJP meeting at Cidco
स्व. गोपीनाथ मुंडे म्हणायचे, शेळ्या, बकऱ्या मोजता, मग ओबीसी माणसे का मोजत नाही?

या कार्यक्रमात महापौर सतीश कुलकर्णी यांच्या व्यतिरिक्त कोणीही मास्क घातलेला नव्हता हे विशेष. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांवर कोरोना नियमांच्या पालनासाठी पोलिस व प्रशासनाचे कठोर नियम व कारवाई तर दुसरीकडे राजकीय नेत्यांकडे कानाडोळा करत असल्याचे अंबड पोलीसांच्या समोरच हा प्रकार घडला. त्याची उपस्थितांमध्ये चर्चा होती.

या सर्व गोंधळात पंकजा मुंडे यांना आपले भाषण देखील करण्यात अडचणी आल्या. त्यामुळे त्यांनी कार्यक्रम आवरता घेतला. यावेळी त्या म्हणाल्या, `खुर्चीसाठी नाही तर समाजासाठी राजकारण करावे. (कै) गोपीनाथ मुंडे यांनी अतिशय परिश्रम घेऊन भाजप राज्यात रुजवला. अगदी पायी प्रवास करून सामान्यांच्या प्रश्नांसाठी ते झटले. लोकांच्या मानत स्थान निर्माण केले. आपला पक्ष शिस्तीचा आहे. त्याचे हे वैशिष्ठ्ये आपणच जपले पाहिजे.

यावेळी आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, रोहिणी नायडू, जगन पाटील, नगरसेविका कावेरी घुगे, पुष्पा आव्हाड, छाया देवांग, गोविंद घुगे, महेश हिरे, वैभव महाले आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com