मुंबईत शिवसेनेला हारवणे हेच आमचे टार्गेट!

रामदास आठवले यांनी भाजप व रिपब्लिकन पक्ष मिळून शिवसेनेला हरवू असा दावा केला.
Ramdas Athawale News, Mumbai Latest Marathi News, Political News in Marathi
Ramdas Athawale News, Mumbai Latest Marathi News, Political News in Marathi Sarkarnama

नांदेड : आम्हाला शिवसेनेला (Shivsena) मुंबई महापालिकेच्या (Mumbai) निवडणूकीत हरवायचे आहे. तेच आमचे मुख्य टार्गेट आहे. भाजप (BJP) आणि रिपब्लिकन पार्टी (RPI) मिळून आम्ही ते करू. त्यासाठी आम्ही कोणतेही पाऊल टाकू मात्र शिवसेनेला हरवूच, असे प्रतिपादन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटले आहे. (Ramdas Athawale said, we will defeat Shivsena In BMC Elections)

Ramdas Athawale News, Mumbai Latest Marathi News, Political News in Marathi
भिशीच्या पैशांसाठी तीने केला नवऱ्याचा खून!

आज नांदेड येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आम्हाला मुंबईत शिवसेनेला हारवायचे आहे. आमचे मुख्य टार्गेट मुंबई महापालिका जिंकणे आहे. शिवसेना यापुर्वी भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पाठींब्याने जिंकत होती. २०१२ मध्ये रिपब्लिकन पार्टीने शिवसेनेला पाठिंबा दिला होता, असं वक्तव्य आठवले यांनी केलं. (Ramdas Athawale News)

Ramdas Athawale News, Mumbai Latest Marathi News, Political News in Marathi
खासदार सुभाष भामरे पर्यावरणप्रेमींना साद घालणार!

श्री. आठवले मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करावी. अशी आमची भाजप आणि रिपब्लिकन पार्टी अशा दोघांचीही आहे.

कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कांग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या खंजीराने आपण एवढे रक्तबंबाळ झाला असाल तर सरकारचा पाठींबा काढून घ्या आणि भाजपला पाठींबा द्या.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com