Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट; शिवसेनेत दोन गट पाडायचे होते...

शिवसेनेत (Shiv Sena) फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत सुरतला पलायन केलं आणि राज्याच्या राजकारणात एकच स्फोट झाला.
Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis

Maharashtra Political Crisis : शिवसेनेत (Shiv Sena) फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत सुरतला पलायन केलं आणि राज्याच्या राजकारणात एकच स्फोट झाला. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले. एक शिंदे गट (Eknath Shinde) आणि दुसरा ठाकरे गट (Uddhav Thackeray). या ४०-५० आमदारांना हाताशी धरुन एकनाथ शिंदेंनी स्वतंत्र गट स्थापन केला आणि राज्यातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं. शिदे गटाने भाजपशी हातमिळवणी केली. राज्यात शिंदे-फडणवीस सर सरकार स्थापन झालं.

राज्यातील या सत्तांतराच्या घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलं होतं. पुढे काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. पण दूसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांसह, अगदी सर्वसामान्य जनताही शिवसेनेतील बंडामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप करत होती. अशातच आता या आरोपाची कबुलीच भाजपच्या एका मोठ्या नेत्याने भर सभेत दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Maharashtra Political Crisis
Ncp News : सतीश चव्हाण विधानसभेच्या तयारीला, बंब यांना देणार आव्हान ?

शिवसेनेत दोन गट पाडणे हे भाजपचचं मिशन होतं. शिवसेनेत फूट पाडण्याचा भाजपचाच डाव होता, असा गौप्यस्फोट भाजपचे मंत्र गिरीश महाजन यांनी केला आहे. जळगावातीव एका सभेत बोलताना त्यांना हा गौप्यस्फोट केला आहे. महत्त्वाचं म्हणजे, या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हेदेखील उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात अखिल भारतीय बडगुजर समाजाचं महाधिवेशनात महाजन यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले. या गोष्टीचा विचार केला तर आम्हालाही विश्वास बसत नव्हता. मात्र ऑपरेशन सुरू केलं. एकनाथजी पुढे निघाले. बघता बघता त्यांचं सर्व सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी जमलंच. सर्व काही जुळून आल्या घडून आल्या. या सर्वांमागे चामुंडा मातेचाही आशीर्वाद होताच."

"हे मिशन एवढं सोपं नव्हतं. शिवसेनेसारख्या पक्षातून चाळीस लोक बाहेर पडतात, उद्धव ठाकरेंना कंटाळून हे सतरा -अठरा लोक बाहेर पडतात. हे मिशन मध्येच फेल झालं तर काय केलं असतं? हे सतरा-अठरा लोक घेऊन बाहेर पडायचं आणि चाळीसपर्यंत मजल गाठायची, पण आपण पन्नास पर्यंत गेलो. हे खूप अवघड होतं. पण पुढारी कसे असतात, तुम्हाला माहिती आहे. आम्ही कसे असतो, तुम्हाला माहिती आहे.", राज्यातली सगळी जनता एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभी राहिले. अनेकांचे आशीर्वाद, प्रार्थना या एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी होत्या, असही गिरीश महाजन यांनी सांगितलं.

आम्ही सांगतो साहेब चार-पाच तास तरी झोपा, रात्री तीन-चार वाजेपर्यंत काम करतायेत, लोकांना भेटतायेत, पण गेल्या अडीच वर्षातले मुख्यमंत्री बघा, ते म्हणायचे मी घरी बसुन काम करतो, कॅम्प्युटरवर काम करतो. असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोलाही लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in